प्रेमासाठी वाटेल ते! लग्नात नवरदेवानेही घातले गळ्यात मंगळसूत्र; वाचा अनोख्या लग्नाची कहाणी..

भारतीय हिंदू रीती रिवाजानुसार लग्नात वधूला वर मंगळसूत्र गळ्यात घालत असतो. मात्र मुंबईत एक असा प्रकार घडला आहे की जो पाहून तुम्ही म्हणाल हे झालेच कसे. या लग्नात वर आणि वधू दोघांनीही एकमेकांना मंगळसूत्र घातले आहे.

जुन्या लग्नाला नवीन रूप देणाऱ्या शार्दूल आणि तनुजा या दोघांच्या लग्नाची गोष्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. शार्दूल ठाकूरने लग्नाच्या दिवशी सर्वाना सांगितले होते की लग्नात तो पण मंगळसूत्र घालणार आहे.

पहिल्यांदा सर्वानी नाराजी व्यक्त केली पण ठरल्या प्रमाणे त्याने गळ्यात मंगळसूत्र घालून घेतले. शार्दूल आणि तनुजा दोघांनीही या संदर्भातील सविस्तर माहिती ‘ह्युमन्स ऑफ बॉंबे’ यांना सांगितली आहे.

शार्दुलने म्हटले आहे की, “लग्नाच्या दिवशी मी आणि तनुजाने एकमेकांना हार घातला तेव्हा आम्हाला खूप आनंद झाला होता.” तनुजा आणि शार्दूल एकमेकांना कॉलेजमध्ये भेटले होते पण त्यांची लव्हस्टोरी कॉलेज संपल्यानंतर चालू झाली.

इंस्टाग्रामवरून एकमेकांशी बोलल्याचे शार्दुलने सांगितले आहे. घरी आई बाबांना सांगायच्या आधी ते एकमेकांना वर्षांपासून डेट करत होते असे त्यांनी म्हटले आहे. शार्दुल म्हणतो, ‘मी तनुजाला सांगितले की, फक्त मुलीनेच मंगळसूत्र का घालावे? याला काही अर्थ आहे? आम्ही दोघेही समान आहोत. म्हणून मीही माझ्या लग्नाच्या दिवशी मंगळसूत्र घालेन.’

शार्दूल आणि तनुजाच्या घरच्यांनी मिळून लग्नाचा खर्च अर्धा अर्धा केला. लग्नानंतर पण शार्दूल मंगळसूत्र घालणार असल्याचे त्याने म्हटले आहे. शार्दुलच्या आणि तनुजाच्या फोटोला इंस्टाग्रामवर मात्र मोठ्या प्रमाणावर पसंद केले जाऊ राहिले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.