उतावळी नवरी! नवरा कोरोना पॉझिटिव्ह असून देखील पीपीई किट घालून केले लग्न

रतलाम | देशात कोरोनाने गेल्या वर्षभरापासून हाहाकार माजवला आहे. कोरोनामुळे प्रशासनाने कडक पावलं उचलली आहेत. दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या वाढत चालली आहे. कोरोनामुळे देशावर एक मोठं संकट आलं आहे.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासन लॉकडाऊनची घोषणा करत आहे. लॉकडाऊनमध्ये कमी लोकांच्या उपस्थित लग्न, राजकीय सभा, अंत्यसंस्कार, सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याची नियमावली करण्यात आली आहे.

अनेक ठिकाणी सरकारच्या नियमांचे काटेकोरपणे पालन होतान दिसून येते. मात्र काहि ठिकाणी नियमांना केराची टोपली दाखवली जाते. जास्त लोकांच्या उपस्थित लग्न, सभा पार पाडत असल्याचं चित्र दिसत आहे.

मध्य प्रदेशच्या  रतलाम शहरामध्ये लग्नाची एक वेगळीच गोष्ट समोर आली आहे. नवरा नवरीने चक्क पीपीई किट घालून लग्न उरकले आहे. त्यांच्या या लग्नाची जोरदार चर्चा सोशल मिडियावर रंगू लागली आहे.

लग्न म्हटलं की नवरा नवरी नव्या रुबाबदार पोशाखामध्ये असतात. मात्र पीपीई किट घालून त्यांनी लग्न करण्यामागे एक कारण आहे. २६ एप्रिल लग्नाची तारीख काढली होती. त्यानंतर नवरदेवाला कोरोनाची लागण झाली.  मात्र लग्नासाठी उतावळा झालेल्या नवऱ्याने पीपीई किट घालून बोहल्यावर चढायचं ठरवलं.

लग्नात नवरानवरीने पीपीई किट घातला आणि त्यांनी सात फेरे घेतले. यावेळी भटजी बूवा आणि काही पाहूणे मंडळींनी पीपीई किट घातले होते.  कोरोनाची लागण झालेला नवरदेव लग्न करत असल्याचं पोलिसांना आणि अधिकाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ लग्नमंडपात धाव घेतली.

पोलिस आणि अधिकारी कारवाई करण्यासाठी गेले असता त्यांनी कुठलीच कारवाई केली नाही. उलट दोन्ही कुटूंबाशी चर्चा करून वरिष्ठ अधिकाऱ्याच्या परवानगीने लग्न पार पडले. कोरोना पॉझिटीव्ह नवरदेवाच्या लग्नाला परवानगी दिल्याने प्रशासनावर सवाल उपस्थित होऊ लागले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
असा मराठमोळा क्रिकेटर होणे नाही, जाणून घ्या विजय हजारेंबद्दल काही रोमांचक गोष्टी
कृषी अधिकाऱ्यांचा सल्ला घेऊन पिकांना दिले जिवामृत, आता कमावतोय लाखो रुपये
कोरोना संकटात नीता अंबानीही मैदानात; मुंबईत उभारणार ८७५ ICU बेड्स, सर्व सुविधाही देणार
देशातील असं एक गाव जिथे एकही कोरोना रुग्ण सापडला नाही; कारण वाचून चकीत व्हाल

 

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.