संचारबंदीतही थाटात सुरू होता विवाहसोहळा; कलेक्टरने नवरानवरीला अटक करून काढली  वरात

त्रीपुरा | देशात कोरोनाने गेल्या वर्षभरापासून हाहाकार माजवला आहे. कोरोनामुळे प्रशासनाने कडक पावलं उचलली आहेत. दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या वाढत चालली आहे. कोरोनामुळे देशावर एक मोठं संकट आलं आहे.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासन लॉकडाऊनची घोषणा करत आहे. लॉकडाऊनमध्ये कमी लोकांच्या उपस्थित लग्न, राजकीय सभा, अंत्यसंस्कार, सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याची नियमावली करण्यात आली आहे.

अनेक ठिकाणी सरकारच्या नियमांचे काटेकोरपणे पालन होतान दिसून येते. मात्र काहि ठिकाणी नियमांना केराची टोपली दाखवली जाते. जास्त लोकांच्या उपस्थित लग्न, सभा पार पाडत असल्याचं चित्र दिसत आहे.

त्रिपुरा राज्यतही अशीच एक घटना घडली आहे. राज्यातील आगरताळा शहरात मोठ्या थाटात विवाह सोहळा सुरू होता. पाहूणे मंडळी मोठ्या संख्येने जमले होते. अशातच जिल्हाधिकारी शैलेश कुमार यादव यांना या शाही विवाह सोहळ्याची माहिती मिळाली आणि त्यांनी थेट पोलिस कर्मचाऱ्यांसह लग्न सोहळा ठिकाणी जाऊन नवरानवरीसह उपस्थित लोकांवर कारवाई केली.

सोशल मिडियावर सध्या जिल्हाधिकारी शैलेश कुमार यादव यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. नियम न पाळणाऱ्यांवर थेट कारवाई केल्याने अनेकांनी शैलेश कुमार यांचे कौतूक केले आहे. व्हिडिओमध्ये पाहू शकता लग्नात सोशल डिस्टन्सिंग दिसत नाही. तर कुणाच्या तोंडाला मास्कही लावलेला दिसत नाही.

विवाह सोहळ्यात त्यांनी नवरदेवाला मंडपातून ओढत बाहेर काढले आहे आणि पोलिसांना सांगून त्याला अटक करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये रात्री १० ते पहाटे ५ पर्यंत नाईट कर्फ्यू सुरू आहे. लग्न सोहळ्याला रात्री १० पर्यंत परवानगी होती. त्यानंतरही कार्यक्रम सुरू होता. त्यामुळे कारवाई केली. असं जिल्हाधिकारी यादव यांनी म्हटलं आहे.

जिल्हाधिकारी शैलेश कुमार यादव यांच्या निलंबणाची मागणी

सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निलंबणाची मागणी केली आहे. कोरोना नियमांचे पालन करून विवाह सोहळा सुरू होता. जिल्हाधिकारी शैलेश कुमार यादव यांनी जबरदस्तीने घुसून अपमानजक भाषा वापरली आहे. यामुळे त्याचं निलंबन करण्याची मागणी नेत्यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
मी जगलोय, आता त्या तरुणाला जगण्याची गरज; ८५ वर्षीय आजोबांनी केला ऑक्सिजन बेडचा त्याग
भारतातील कोरोना परीस्थीतीवर बोलताना अक्षरश ढसाढसा रडली शिल्पा शेट्टी; म्हणाली…
उतावळी नवरी! नवरा कोरोना पॉझिटिव्ह असून देखील पीपीई किट घालून केले लग्न
रिक्षा चालवून, संत्री विकून झाला करोडपती; गरीबीची जाणीव ठेवत आता पुरवला ४०० टन ऑक्सिजन

 

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.