लग्न सोहळा सुरू होता, सहाव्या फेऱ्यानंतर नवरी अचानक थांबली, आणि…

ज्या घरात लग्न असते तिथे वेगळेच वातावरण असते. नवविवाहित जोडपे आपले लग्नासाठी खूप आनंदात असतात. सगळ्या कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले पाहायला मिळते. लग्नाच्या अगोदर अनेक वेगवेगळे कार्यक्रम असतात. मात्र, उत्तर प्रदेशातील महोबामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

लग्नाचे संपूर्ण विधी जवळपास पूर्ण झाले असताना एका तरुणीने लग्न मोडले. सप्तपदी घेत असताना सहाव्या फेऱ्यानंतर तरुणी थांबली आणि तिने लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे उपस्थितांना धक्का बसला. यानंतर रात्री पंचायत बोलावण्यात आली.

मात्र सगळ्यांनी खूप प्रयत्न करूनही तरुणी तिच्या मतावर ठाम राहिली. त्यामुळे नवऱ्याला वरात नवरीशिवाय माघारी नेण्याची वेळ आली. गुरुवारी उत्तर प्रदेशमधल्या महोबामध्ये झाशीच्या कुलपहाड तहसीलमधील एका गावातून एक वरात आली होती. मुलीकडच्यांनी नवऱ्या मुलाकडच्यांचे जोरदार स्वागत केले.

ढोल-नगाऱ्यांच्या तालात वराती मंडळींनी ताल धरला. यानंतर लग्नाचे विधी संपन्न होऊ लागले. नवरा-नवरीने एकमेकांच्या गळ्यात हार घातला. दोन्ही बाजूंनी फोटो काढले. त्यानंतर सात फेरे घेण्यास सुरुवात झाली. मात्र सहा फेरे होताच नवरी थांबली आणि तिने लग्नास नकार दिला.

सातवा फेरा शिल्लक असताना नवरी अचानक थांबल्याने उपस्थितांना धक्काच बसला. नातेवाईकांनी मुलीला लग्न मोडण्याचे कारण विचारले. त्यावर ‘मला नवरा आवडला नाही. त्यामुळे मी लग्न करणार नाही, असे उत्तर मुलीने दिले.

मुलीने सहाव्या फेऱ्यानंतर अचानक लग्न मोडल्याने नातेवाईक पाहातच राहिले. मला या मुलाशी लग्न करायचे नाही, असे म्हणत तिने लगीनगाठ सोडली आणि स्वत:च्या खोलीत निघून गेली. या प्रकारामुळे सगळीकडे खळबळ सुरू झाली. सगळ्यांना या घटनेमुळे धक्काच बसला.

ताज्या बातम्या

स्वत:च्याच मैत्रीणीच्या नवऱ्याच्या प्रेमात पडल्या होत्या श्रीदेवी; मैत्रीणीचा संसार मोडला होता

अमेरिकन टॉम अल्टरचा जन्म झाला होता भारतात; चित्रपटांमध्ये विदेशी खलनायक बनून अभिनेत्यांना दिला त्रास

“देशात यापूर्वीही मोठ्या प्रमाणात लसीकरण केले, पण कधी अशी चमकोगिरी केली नाही”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.