घरात लग्नकार्य असेल तर आताच खरेदी करा सोने; तब्बल तीन हजारांनी स्वस्त मिळतय

सध्या दिवाळी संपली असून आता अनेक घरांमध्ये लग्नाचे मुहूर्त काढले जात आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणावर सोनं देखील खरेदी केले जाते. सोनं स्वस्त असतो किंवा महाग ते खरेदी केलेच जाते. असे असताना आता महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी आली आहे. जर तुम्ही सोनं खरेदी करणार असाल तर तुमचा यामुळे फायदा होणार आहे.

ही फायद्याची बातमी अशी आहे की, सोने विक्रमी पातळीपासून 3000 रुपयांनी स्वस्त झाले आहे. दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत किरकोळ वाढ झाली. सध्या दिल्ली सराफा बाजारात सोने 48,175 रुपये प्रति तोळावर आहे. तसेच चांदीचा भाव 65,268 रुपये प्रति किलोवर आहे.

आज हाच सोन्याचा भाव 49 हजारांच्या आसपास आहे. यामुळे गेल्यावर्षी याचवेळी नोव्हेंबरमध्ये 52 हजार रुपयांच्या जवळपास सोन्याचा भाव होता. हा एक मोठा विक्रम होता. यामुळे सोने विक्रमी पातळीपासून 3000 रुपयांनी स्वस्त होत आहे. याचा आपल्याला फायदा होणार आहे.

तसेच चांदी विक्रमी पातळीपेक्षा एक हजार रुपयांनी महागली आहे. यामुळे एक संधी आहे. सध्या लग्नसराई सुरू असून कोरोना महामारीनंतर आता मोठी लग्न पार पडत आहेत. यामुळे आता बाजारात तेजी आली आहे.

लग्नसराईमुळे मोठ्या प्रमाणावर उलाढाल होत आहे. यामुळे आता सोन्याचे भाव देखील तेजीत आहे. असे असताना तीन हजार रुपये आपला गेल्यावर्षीपेक्षा फायदा होणार आहे. यामुळे आता अनेकजण बाहेर पडत आहेत. यामुळे विक्रमी विक्री होत आहे.

सध्या मार्केटमध्ये देखील चांगला उठाव आहे. त्यातच आता सहा महिने लग्नसराई असणार आहे. कोरोनामुळे थांबलेले अर्थचक्र देखील पुन्हा एकदा सुरू झाले आहे. यामुळे आता सोनं खरेदी करण्याची ही एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.