शाॅर्ट्स घातल्याने तरुणीला पेपरला बसू दिले नाही, शेवटी पडदा गुंडाळून द्यावा लागला पेपर

समाजात अजूनही मुलींबद्दल साकारत्मक विचार केला जात नाही. अनेक ठिकाणी मुलींबाबत वेगळा विचार केला जातो. मुलींच्या शिक्षणाबद्दल तिचे मत काय आहे, त्यांच्या कपड्यांपासून ते हक्कांपर्यंत सगळ्या गोष्टींसाठी तिला संघर्ष करावा लागतो. काहीजण मुलींच्या हक्कांवर जास्त भर देतात, तर काहीजण अजूनही मुलींच्या ड्रेससारख्या छोट्या छोट्या गोष्टींवर प्रश्न विचारत राहतात.

नैतिकता त्यांच्या डोक्यावर थैमान घालत राहते. आसाममधून अशीच एक घटना समोर आली आहे. येथे एक १९ वर्षीय मुलगी विद्यापीठासाठी प्रवेश परीक्षा देण्यासाठी गेली होती, परंतु तिने शोर्ट्स घातल्याने तिला परीक्षा हॉलमध्ये प्रवेश दिला गेला नाही.

आसाममध्ये तेजपूरमध्ये ही घटना घडली आहे. १५ सप्टेंबर रोजी गिरीजानंद चौधरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी, तेजपूर येथे प्रवेश परीक्षा घेण्यात आली. ही कृषी प्रवेश परीक्षा होती. जी आसाम कृषी विद्यापीठाने घेतली होती. या विद्यापीठाला थोडक्यात AAU म्हणतात.

१९ वर्षीय ज्युबिली तमुली देखील या परीक्षेत बसण्यासाठी आली होती. पण तिने शोर्ट्स घातली होती. आणि म्हणूनच तिला परीक्षा हॉलमध्ये प्रवेश दिला गेला नाही. तिला पायावर पडदा
लावण्याची वेळ आली. त्यानंतर तिला परीक्षा हॉलमध्ये जाण्याची परवानगी मिळाली. यामुळे याची सगळीकडे चर्चा सुरू झाली आहे.

याबाबत ती म्हणाली, मी परीक्षा हॉलमध्ये जात असताना, एका निरीक्षकाने मला बाजूला उभे केले आणि थांबायला सांगितले, बाकीचे विद्यार्थी आत जात राहिले. माझ्याकडे माझी सर्व कागदपत्रे, प्रवेशपत्र, आधार कार्ड सर्व काही होते. पण त्याने ते तपासले नाही.

त्यात म्हटले की, शॉर्ट ड्रेसला परवानगी नाही. मी विचारले की असे का? तर प्रवेशपत्रात अशा काही गोष्टींचा उल्लेख नव्हता. मग त्याने मला सांगितले की मला याबद्दल माहिती नाही. प्रवेशपत्रात असा उल्लेख असता तर मला समजले असते, असे तिने सांगितले.

अनेक मुली लहान कपडे घालतात. जर त्यांनी परवानगी दिली नाही, तर त्यांनी प्रवेशपत्रात त्याचा उल्लेख करायला हवा होता. जेव्हा मी ऑब्झर्व्हरला सांगितले की माझ्या वडिलांना तुझ्याशी बोलायचे आहे, तेव्हा त्याने बोलण्यास नकार दिला. मग शेवटी माझ्या वडिलांना मला एक पँट आणायला सांगितली.

जेव्हा माझे वडील पॅंट घेऊन लवकर आले नाहीत, तेव्हा दोन मुली बुरखा घेऊन आल्या आणि मला ते गुंडाळण्यास सांगितले. नंतर मी ते गुंडाळले आणि परीक्षा हॉल गाठले, असे तिने सांगितले. यामुळे आता ती याची शिक्षणमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.