सिरमच्या पुनावालांची संपत्ती पाहून चकीत व्हाल; घोड्यांवर लावतात कोट्यवधींची बोली

पुणे । गेल्या आठ महिन्यांपासून देशात कोरोनामुळे अनेकांचे जीव गेले आहेत. यामुळे कोरोना लसीची सर्वजण वाट बघत आहेत. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये या लसीवर काम सुरू आहे. नरेंद्र मोदी आज याठिकाणी भेट देऊन आढावा घेणार आहेत.

सिरम ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. या कंपनीचा इतिहास बघायला गेले तर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही रोगप्रतिकारक औषधे निर्माण करणारी कंपनी आहे. औषध निर्माण करणारी जगातली सर्वोत्तम कंपनी म्हणून ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला नावाजले जाते.

सायरस पूनावाला यांनी १९६६ साली या कंपनीची स्थापना केली. या कंपनीचे मुख्यालय पुण्यात आहे. शरद पवारांचे पुण्यातील बीएमसीसी कॉलेजमधील वर्गमित्र असलेल्या सायरस पुनावाला यांनी पुण्यातील हडपसर भागात 1966 साली सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची स्थापना केली.

अध्या १०० देशांपेक्षा जास्त देशांना ही कंपनी औषधे पुरवते. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही १.५ बिलियनहून अधिक औषधांची निर्मिती करणारी देशातील सर्वात मोठी कंपनी आहे. जगातील प्रत्येक दुसऱ्या लहान मुलाला ‘सिरम’ची लस दिली जाते. आता त्यांनी विकसित केलेल्या लसीने कोरोना बरा होणार का, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष आहे.

सायरस पूनावाला हे सीरम इन्स्टिट्यूटचे संस्थापक आहेत. हॉर्स रेसिंगची आवड असलेल्या एका पारशी कुटुंबात सायरस यांचा जन्म झाला. पुण्याच्या बिशप स्कूलमधून त्यांनी शिक्षण घेतले आणि पुणे विद्यापीठातून १९६६ साली ते पदवीधर झाले. औषध क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल २००५ साली भारत सरकारने त्यांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान केला.

ऑक्सफर्ड विद्यापीठाकडून त्यांना विज्ञान शाखेतील डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली. जगातील मोठ्या श्रीमंत लोकांमध्ये त्यांचे नाव घेतले जाते. सायरस यांची एकूण संपत्ती ७३ हजार कोटी इतकी आहे.

त्यांना घोड्यांच्या शर्यतींची मोठी आवड आहे. यासाठी ते मोठ्या प्रमाणावर पैसे खर्च करत असतात. त्यानी हडपसर येथे देशातील पहिला स्टड फार्म सुरू केला. घोड्यांवर ते कोट्यवधी रुपयांची बोली लावत असतात.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.