अब्जाधीश पतीला सोडून मिळवली ‘इतक्या’ कोटींची संपत्ती, मग शिक्षकासोबत केले लग्न

न्युयॉर्क | २५ वर्षाच्या संसारानंतर अब्जाधीश पतीशी घटस्फोट घेऊन लेखिका मॅकेंझी स्कोट पुन्हा एकदा वयाच्या ५० व्या वर्षी विवाह बंधनात अडकल्या आहेत. मॅकेंझी स्कोट या ऍमेझॉन कंपनीचे मालक आणि जगातील श्रीमंत व्यक्ती जेफ बेझॉस यांच्या पत्नी होत्या.

लेखिका असलेल्या मॅकेंझी स्कोट यांनी डॅन जुएट या शिक्षकाशी लग्नगाठ बांधली आहे. डॅन जुएट हे शाळेत शिक्षक म्हणून शिकवण्याचे काम करतात. मॅकेंझी स्कॉट आणि जेफ बेझॉस यांची मुले ज्या शाळेत शिकतात त्याच शाळेत डॅन जुएट हे विज्ञान विषय शिकवतात. मॅकेंझी स्कोट मुलांसोबत आणि पती डॅन जुएट यांच्यासोबत राहतात.

२५ वर्षापुर्वी मॅकेंझी स्कोट आणि जेफ बेझॉस यांची ओळख झाली होती. त्यानंतर ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले होते आणि त्यानंतर त्यांनी लग्न केले होते. मॅकेंझी स्कोट यांनी दिड वर्षापुर्वी अब्जाधीश असलेला पती जेफ बेझॉस यांच्याशी घटस्फोट घेतला होता.

मॅकेंझी या ३ लाख ८६ हजार ६३७ कोटी रूपयांच्या मालकीण आहेत. पतीशी घटस्फोटानंतर मॅकेंझी स्कोट यांना कंपनीची चार टक्के भागीदारी मिळाली होती. घटस्फोटानंतर मॅकेंझी यांचे नशीबचं पालटले आणि त्या  जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या नावाच्या यादीत २२ व्या क्रमांकावर आल्या होत्या.

दरम्यान शिक्षक डॅन जुएट आणि मॅकेंझी स्कोट यांच्या लग्नानंतर ऍमेझॉनचे मालक जेफ बेझॉस यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. डॅन आणि मॅकेंझी यांना सोबत पाहून मला आनंद होत आहे. असं बेझॉस यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
आश्चर्यंम! बहाद्दरानं जुन्या साडीपासून २ मनिटात बनवली दोरी, व्हिडीओ पाहून थक्क व्हाल
सेक्स आयकॉन बोलणाऱ्या लोकांना श्रीदेवीने दिले होते ‘हे’ उत्तर; उत्तर ऐकून तुम्हाला गर्व वाटेल
प्रेरणादायी! ४६ वर्षीय अम्मा युट्यूबवरून कमावतात लाखो रूपये, वाचा कसे…

 

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.