पंढरपूर | राज्यात दूध दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यभरात आंदोलन पुकारले आहेत. यात अनेक ठिकाणी दुधाची नासाडी केली जात आहे, तर कुठे दुधाचे टँकर फोडले जात आहे.
आता एकीकडे राज्यभर आंदोलन सुरू असताना दुसरीकडे एका चिमुरड्याने चक्क बादलीभर दुधाने अंघोळ केली आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जास्तच व्हायरल होत आहे.
या व्हिडीओत बादलीभर दुधाने हा चिमुरडा अंघोळ करताना दिसत आहे, आम्ही कायबी करीन, आमचं दूध आहे, दुधाने अंघोळ करीन नाय तर जनावरांना घालीन, असे हा लहान मुलगा म्हणाला आहे.
तसेच दुधाला दर जोपर्यंत येत नाही तो पर्यंत आम्ही दूध वाटणार नाही आणि तोपर्यंत दूध डेअरीला पण देणार नाही, असाही तो लहान मुलगा म्हणत आहे. त्यामुळे सगळीकडे या चिमुरड्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
दरम्यान, दूध उत्पादकांना गायीच्या दुधासाठी किमान ३० रुपये प्रति लिटर भाव द्यावा या मागणीसाठी राज्यभरात आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
मात्र या पार्श्वभूमीवर दुग्ध विकासमंत्री सुनील केदार यांनी बोलावलेल्या बैठकीत कोणताही ठोस निर्णय घेण्यात न आल्याने शेतकरी पुन्हा निराश झाले आहेत.
‘आम्ही कायबी करीन, दुधाने अंघोळ करीन नाहीतर जनावरांना घालीन पण दुधाला दर मिळाल्याशिवाय दूध वाटणार नाय अन डेअरीमध्ये दूध घालणार नाय' pic.twitter.com/wXFPFrucWD
— Mulukhmaidan (@MulukhMaidan) July 23, 2020