दिल्लीत परमबीर कुणाला भेटले, कधी भेटले? काय चर्चा केली? सगळं माहितीय, वेळ येताच सगळं उघड करू

मुंबई : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे चांगलेच वादात सापडले आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपानंतर देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशमुख क्वारंटाईनमध्ये होते, असे सांगत राजीनाम्याची मागणी फेटाळून लावली आहे.

तर दुसरीकडे परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बवर प्रतिक्रिया देण्यास नकार देणारे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आता या संपूर्ण प्रकरणावर मोठं विधान केले आहे. याबाबत ते माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘परमबीर सिंग यांनी पत्र लिहून कट कारस्थान केलं आहे,’ असा आरोप त्यांनी केला आहे.

तसेच ‘दिल्लीहून आल्यानंतर सिंग यांनी हे पत्र लिहिलं. दिल्लीत ते कुणाला भेटले? कधी भेटले? काय चर्चा केली? त्याची माहिती आमच्याकडे आहे. वेळी आली तर ही संपूर्ण माहिती उघड करू,’ असा इशाराही मलिक यांनी यावेळी बोलताना दिला आहे.

दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख कोरोना पॉझिटिव्ह असताना त्यांना भेटल्याचा आरोप करणारे माजी आयुक्त परमवीर सिंग यांनी कटकारस्थान करुन महाविकास आघाडीला आणि गृहमंत्र्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे, त्याची चौकशी होईलच व त्यादृष्टीने कारवाई होणार असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

मात्र, गृहमंत्री अनिल देशमुख यांचा तूर्तास राजीनामा घेतला जाणार नाही, असा निर्णय पक्षाने घेतल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली. मुंबईचे माजी आयुक्त परमवीरसिंग यांच्या चिठ्ठीवर जो वाद निर्माण झाला, त्यावर नवाब मलिक यांनी स्पष्टीकरण देत उत्तर दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

मनसुख हिरेन प्रकरणाचे गुजरात कनेक्शन उघड? व्हॉट्सऍप कॉलमुळे दोन आरोपी ATS च्या जाळ्यात

वाढदिवसाच्या एक दिवस अगोदर व्हिडीओ शेअर करत कंगनाने चाहत्यांना दिली गुड न्यूज; पहा व्हिडीओ

शरद पवार हे क्लीन चिट द्यायला न्यायाधीश नाहीत; भाजपाचा हल्लाबोल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.