आम्ही लोकांना मरताना पाहू शकत नाही, केंद्र सरकारने डोळ्यावर पट्टी बांधलीय; न्यायालयाने झापले

देशामध्ये कोरोना रुग्णसंख्येने उच्चांक गाठला आहे. देशामध्ये कोरोना रुग्णांची संख्या २ कोटींच्यावर गेली आहे आणि कोरोनामुळे मृत पावलेल्या रुग्णांची संख्या २ लाखाच्यावर गेली आहे. भारत जगात तिसरा देश आहे ज्याची कोरोनामुळे मृत पावलेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे.

अनेक राज्यांमध्ये वैद्यकीय अवस्था तितकीशी चांगली नसल्यामुळे ऑक्सिजन सिलिंडर आणि व्हेन्टिलेटर्स बेडची पण मोठ्या प्रमाणावर गरज पडताना दिसून येत आहे. मंगळवारी उच्च न्यायालयात कोरोना व्यवस्थापनासंदर्भात झालेल्या सुनावणीमध्ये न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले आहे.

न्यायालयाने ऑक्सिजन सिलिंडरच्या व्यवस्थापनासंर्भात बोलताना म्हटले आहे की, “देशात करोनासंदर्भातील जी परिस्थिती निर्माण झालीय त्याबद्दल तुम्ही आंधळेपणाचं नाटक करु शकता आम्ही नाही. आम्ही लोकांना मरताना पाहू शकत नाही, केंद्र सरकारने डोळ्यांवर पट्टी बांधली असून आम्ही असं करु शकत नाही”.

यावर केंद्र सरकारच्या वतीने बाजू मांडताना अतिरिक्त सॉलिसिटर जनरल चेतन शर्मा यांनी भावनिक होण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. त्यावर न्यालयाने लोकांचे प्राण दावाला लागल्यामुळे हा भावनिक मुद्द्दा असल्याचे म्हटले आहे. दिल्लीतील कोरोना परिस्थितीसंदर्भात घेण्यात आलेल्या निर्णयावर पण न्यालयाने या वेळी संताप व्यक्त केला आहे.

न्या. विपीन सांघी आणि न्या. रेखा पिल्ले यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी झाली आहे. दिल्लीमध्ये ऑक्सिजनची कमी असल्यामुळे अनेक रुग्णांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यावर न्यायालयाने ऑक्सिजन बँक उभी करून ती गरज भागवण्याचा सल्ला दिला.

महाराष्ट्र राज्यात जर ऑक्सिजन वायूचा वापर कमी होत असेल तर तो ऑक्सिजन टँकरने दिल्ली राज्यात पाठविण्यात येईल असेही न्यायालयाने म्हटले आहे. केंद्राने यावेळी म्हटले आहे की, “आम्ही आज सर्वोच्च न्यालयासमोर आमचा अहवाल सादर करणार आहोत. ७०० मेट्रिक टन ऑक्सिजन द्यायचा की नियोजित कोटा पूर्ण करायचा यासंदर्भातील भाष्य आज करणार नसल्याचे पण केंद्राने यावेळी स्पष्ट केले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.