ठाण्यामधील शिवसेनेत रविवारी नवनियुक्त्या झाल्यानंतर सोमवारी शिवसेनेचे खासदार राजन विचारे, नवनियुक्त पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी स्वर्गीय आनंद दिघे समाधी स्थळावरचे दर्शन घेतले आणि आनंद आश्रमात शक्तीप्रदर्शन केले. त्याप्रसंगी प्रथमच राजन विचारे यांनी इतक्या दिवसांचे आपले मौन तोडले. ( Public warning to Shinde group of angry Rajan Vichare)
खासदार राजन विचारे म्हणाले की, आम्ही शिवसैनिक आहोत.. तेव्हा अतिरेक करू नका. जशास तसे उत्तर दिले जाईल, असा थेट इशाराच त्यांनी नाव न घेता मुख्यमंत्र्यांना दिला.
‘दिघेंच्या रक्ताच्या नात्यातील माणूस आज जिल्हाप्रमुख झाला. आकसाने कोणाचे झुणका भाकर केंद्र बंद करू नका. आपापसात काही करायला लावू नका. याच शिवसैनिकांमुळे तुम्ही मोठ्या पदापर्यंत पोहोचला आहात,’ असे विचारे म्हणाले.
‘बाळासाहेबांचे, दिघेसाहेबांचे नाव घेता तसे काम करा. आम्ही शिवसैनिक आहोत. अतिरेक करू नका. नाहीतर जशास तसे उत्तर दिले जाईल,’ असा थेट इशाराच विचारे यांनी याप्रसंगी प्रसारमाध्यमांसमोर नाव न घेता एकनाथ शिंदे यांना दिलेला दिसतो.
नवनियुक्तीप्रमाणे आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांची ठाण्याच्या जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर उपनेतेपदी अनिता बिर्जे यांची वर्णी लागली आहे. अशाप्रकारे ठाण्यामध्ये शिवसेना पुन्हा जोमाने कार्यरत झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ठाणे जिल्हा ओळखला जातो. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक खासदार, आमदार, पदाधिकारी, नगरसेवक यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यावर ठाण्याच्या शिवसेनेच्या संघटनेलाच तडा गेला. या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी पुन्हा नवनियुक्त्या करून शिवसेना ठाण्यात आक्रमक झाल्याचे दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या-
केंद्रीय यंत्रणांनी भाजप नेत्यांवर कारवाई केल्याचा पुरावा दाखवा आणि १ लाख रुपये मिळवा; औरंगाबादमधल्या बॅनरची राज्यभर चर्चा
Birthday Party: धक्कादायक! केक कापताना मेणबत्तीचा झाला स्फोट, मुलाचा गाल अन् जीभ भाजली, प्रकृती गंभीर
Timepass 3: टाईमपास ३ चा बाॅक्स ऑफीसवर जोरदार धडाका; ३ दिवसांत केली तब्बल ‘एवढ्या’ कोटींची कमाई