‘या’ एका चुकीमुळे वाझे पुरता अडकला, एनआयएने केला नवा धक्कादायक खुलासा

मुंबई | मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार सापडली होती. यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. त्यानंतर ही कार मनसुख हिरेन नावाच्या व्यक्तीची असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर काही दिवसांनी मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला होता.

मनसुख हिरेन यांच्या हत्येचा तपास महाराष्ट्र एटीएस करत होती. तर अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटकांचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयए करत होती. ही दोन्ही प्रकरणे एकमेकांशी निगडीत आहेत. कोर्टाने मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास एटीएसकडून काढून घेत एनआयएकडे दिला आहे.

राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयएने पोलिस अधिकारी सचिन वाझेला कारमध्ये स्फोटके आणि धमकीचं पत्र ठेवल्याप्रकरणी अटक केली आहे. एनआयएने तपास करत या प्रकरणात मोठी माहिती समोर आणली आहे. आता पुन्हा एकदा एनआयएने नवा धक्कादायक खुलासा केला आहे.

मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली कार सचिन वाझेने उभी केल्यानंतर कारमध्ये अंबानी यांना धमकी देणारे पत्र ठेवायला सचिन वाझे विसरले होते. त्यानंतर काही वेळाने पुन्हा वाझेने इनोव्हा कारमधून येऊन स्कॉर्पिओमध्ये पत्र ठेवलं असल्याचं तपासात समोर आलं आहे.

एनआयएला या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज हाती लागले होते. त्यामध्ये वाझे पांढरा कुर्ता घालून अंबानींच्या घराजवळ रस्त्यावर फिरताना कैद झाला होता. या सर्व प्रकारानंतर सचिन वाझेच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

दरम्यान सचिन वाझेला अटक केल्यानंतर राज्य सरकारने मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी केली होती. त्यानंतर त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सचिन वाझेला अनिल देशमुखांनी महिन्याला 100 कोटी वसुल करण्याचे टार्गेट दिले असल्याचं आरोपात म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
नाद खुळा! ऊसाची शेती करता करता सुचली भन्नाट आयडिया, आता कमवतोय लाखो रुपये
आमदारांनी महावितरण अभियंत्यांना खुर्चीला बांधलं; वाचा संपूर्ण प्रकरण
नाही नाही म्हणत अखेर मुख्यमंत्र्यांनी तो निर्णय घेतलाच; कोरोना रोखण्यासाठी रविवारपासून संपूर्ण राज्यात रात्रीची जमावबंदी
सक्तीने निवृत्त केलेल्या आयपीएस अधिकाऱ्याचा मोदी सरकारला टोला, घराबाहेर लावला ‘हा’ फलक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.