कोरोनाच्या बचावासाठी हर्ड ईम्यूनिटीचा उपाय आहे जीवघेणा; WHO ने सांगीतले ‘हे’ गंभीर धोके

गेल्या अनेक दिवसांपासून सगळे जग कोरोना महामारीचा सामना करत आहे. अनेक देशात अजूनही लॉकडाउन सुरू आहे. तर काही ठिकाणी अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. जगभरातील शास्त्रज्ञ कोरोनावर लस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. पण अजून कोणत्याही देशाला यश मिळाले नाही.
वैज्ञानिकांनी कोरोनावर मात करण्यासाठी हर्ड ईम्यूनिटी तयार व्हायला हवे असे मत व्यक्त केले होते. पण जागतिक आरोग्य संघटनेने या गोष्टीला नकार दिला आहे. कारण हर्ड ईम्यूनिटीसाठी लोकसंखेचा एक मोठा भाग कोरोना संक्रमित व्हायला हवा. हे योग्य नाही.
हर्ड ईम्यूनिटी म्हणजे ज्यामध्ये मोठ्या समुहाला आजाराचे संक्रमण व्हायला हवे. त्यामूळे त्यांच्या शरीरात आजाराशी लढत असलेल्या एंटीबॉडीज तयार होतात. पण यासाठी मोठ्या प्रमाणावर लोकसंख्येचा कोरोना संक्रमित व्हायला हवा. जे अतिशय धोक्याचे आहे.
यावर जागतिक आरोग्य संघटनेने हा धोका पत्करण्यापेक्षा लशीची वाट बघणे योग्य ठरेल. असे म्हटले आहे. एंटीबॉडी तयार करण्याची हीच क्रिया लसीकरणाच्या माध्यमातूनही होऊ शकते. असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
WHO चे प्रमुख ट्रेड्रोस अडनहॅम घेब्रियेसुस यांनी सांगितले की, ‘ज्या व्हायरसबद्दल आपल्याला माहीती आहे. त्या व्हायरसचा प्रसार होऊ देणे योग्य नाही. या माहामारीपासून बचावासाठी कोणताही रामबाण उपाय सापडलेला नाही. कोरोनाच्या विरोधात इम्यूनिटी विकसित करण्याबाबत माहितीचा अभाव असल्याचे सांगितले होते.’
त्यांनी पुढे सांगितले की, जास्तीत जास्त देशांमध्ये १० टक्क्यांपेक्षा कमी लोकसंख्या ही व्हायरसच्या संपर्कात आली होती. अजूनही अनेक देश व्हायरसच्या प्रसाराबाबत असंवेदनशील आहेत. मागच्या चार दिवसात अमेरिका आणि युरोपच्या काही भागात कोरोनाच्या रुग्णसंख्येने एक नवीन रेकॉर्ड केला आहे.’ त्यामूळे हर्ड ईम्यूनिटीचा उपाय योग्य नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
धक्कादायक! मिथून चक्रवर्ती यांच्या मुलावर बलात्काराचा गुन्हा दाखल
स्मार्टफोनच्या किंमतीत मिळत आहेत हिरो स्प्लेंडर आणि बजाज प्लॅटिना; किंमत फक्त…
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.