आधारकार्ड किंवा पॅनकार्डवरील चुका दुरुस्त करण्याची सर्वात सोपी पद्धत, जाणून घ्या

अनेक जणांच्या आधारकार्ड किंवा पॅनकार्डवर नावाच्या चुका असतात. अर्ज करताना काही कारणास्तव बिघाड झाल्याने स्पेलिंगमध्ये गडबड झाल्याचा अनुभव अनेकांना आला असेल. त्यामुळे इतर व्यवहारात अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना आपल्याला करावा लागू शकतो.

पण चिंता करण्याची गरज नाही तुम्ही सहज पद्धतीने आपल्या नावाची दुरुस्ती करू शकता. आधार नंबर म्हणजे UIDAI करून जारी केलेला १२ अंकी नंबर असतो. आधार कार्ड अपडेट ठेवणे खूप गरजेचे आहे कारण आजकालच्या सगळ्या कामात आधारकार्ड लागतेच.

दुसरीकडे पॅनकार्ड ही आयुष्यभर आपल्याला लागणारच आहे. तुमच्या राहण्याच्या पत्त्यात बदल झाला तरी पॅन कार्डवर जास्त फरक पडत नाही. पॅन कार्डवर तुमचे नाम, जन्म तारीख आणि फोटो असतो.

पण जे नावांमध्ये बदल झाला तर गडबड होऊ शकते त्यामुळे त्वरित दुरुस्ती करून घेणे आवश्यक आहे. सर्वात आधी आधार कार्डसाठी आधार नामांकन केंद्रावर भेट द्या. आधार संशोधन फॉर्ममध्ये योग्य माहिती भरा.

त्यानंतर फॉर्मसोबत तुम्हाला लागणारी व्यवस्थित असलेली कागदपत्रं जोडा. २५ ते ३० रुपयांमध्ये ही माहिती अपडेट करून मिळेल. या स्टेप्स फॉलो केल्यानंतर तुमचे नाव बदलून मिळेल.

आता पॅनकार्डसाठी नॅशनल सिक्युरिटीज डिपॉजिटरी लिमिटेड वेबसाइटवर भेट द्या. Correction in Existing PAN हा पर्याय निवडा. त्यानंतर श्रेणी प्रकार निवडायचा आहे. योग्य नाव असलेली कागदपत्रे जोडा. तुम्हाला शुल्क भरावे लागेल, मात्र नेमकी रक्कम किती लागेल याची माहिती नाही. ४५ दिवसांच्या आत तुम्ही नमूद केलेल्या पत्त्यावर पॅनकार्ड येईल.

महत्वाच्या बातम्या
१ डिसेंबरपासून बँकिंगच्या नियमांमध्ये होणार महत्वाचा बदल, जाणून घ्या
आता सातबारा उताऱ्यावर तलाठ्याच्या सहीची गरज नाही; जाणून घ्या सरकारचा नवा नियम
तुमच्याकडे जुनी कार असेल तर सावधान! कारण सरकारने बदललेत नियम, वाचा सविस्तर
आधारकार्डात नाव, पत्ता व जन्मतारीख बदलण्यासाठी लागतील ‘ही’ कागदपत्रे; सरकारने बदलले नियम

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.