देशात कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही?, ICMR ने सांगितली खरी वस्तुस्थिती, जाणून घ्या..

कोरोनामुळे देशात थैमान सुरू आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सगळीकडे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अनेक नागरिकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. कोरोनामुळे अनेक नागरिक बेरोजगार झाले असून, तिसऱ्या लाटेचे संकेत दर्शवण्यात आले आहेत.

त्यामुळे महत्वपूर्ण पाऊल सरकार उचलत आहे. खबरदारी म्हणून काळजी घेतली जात आहे. तिसऱ्या लाटेसंदर्भात ICMR आणि Imperial College लंडनेने एक संयुक्त रिपोर्ट तयार केला आहे. देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता फार कमी आहे. असे या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.

संयुक्त रिपोर्टमध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा खुलासा देखील करण्यात आला आहे. रिपोर्टनुसार फक्त चार कारणांमुळे देशात कोरोनाची तिसरी लाट येवू शकते. कोरोना लाटेचे पहिले कारण म्हणजे ज्यांनी आतापर्यंत लस घेतली नाही. लस न घेतल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती फार कमी होते. दुसरे आणि धक्कादायक कारण म्हणजे व्हायरसचा नवा व्हेरिएन्ट.

कोरोना व्हायरसचा नवा व्हेरिएन्ट आल्यास त्याचा रोगप्रतिकार शक्तीवर फार गंभीर परिणाम होवू शकतो. कोरोना व्हायरसचा नवा व्हेरिएन्ट आल्यास तो जुन्या व्हेरिएन्टच्या तुलनेत अधिक फैलू शकतो. हे तिसऱ्या लाटेचे तिसरे कारण आहे. चौथ कारण म्हणजे होत असलेले अनलॉक. अनलॉकमुळे लोक रस्त्यांवर गर्दी करत आहेत.

या चार कारणांमुळे कोरोना पुन्हा तिसऱ्या लाटेच्या रूपात हाहाकार माजवू शकतो, असे संयुक्त रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे नागरिकानी कोरोनाचे नियम पाळणे गरजेचे आहे. स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेणे देखील गरजेचे आहे.

ताज्या बातम्या

अजबंच! अवघ्या १३ महिन्यांच्या चिमुकलीच्या पोटात गर्भ; वाचा काय आहे प्रकरण…

मोठी बातमी! आयपीएलनंतर भारतात होणारा टी-२० वर्ल्डकपही रद्द, आता या देशात रंगणार सामने

पैशांसाठी सगळं सहन करत होते, कपिल शर्माच्या त्या कृत्यावर सुमोना चक्रवर्तीचा मोठा खुलासा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.