लागीर झालं फेम आज्याचा धम्माल डान्स विडिओ बघितला का? पाहा जबरदस्त विडिओ

मुंबई । लागीर झालं जी या मराठी मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता अज्या सध्या खुपच चर्चेत आहे. त्याचा डान्स विडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अज्या म्हणजेच अभिनेता नितीश चव्हाण असे त्याचे नाव आहे. त्याच्या भूमिकेमुळे तो मालिकेत चर्चेत आला आहे.

नितीशचे अनेक डान्स व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. त्यामध्ये तो धम्माल डान्स करताना दिसून येत आहे. कधी आपल्या मैत्रिणीसोबत तर कधी सोलो डान्स व्हिडीओ नितीश शेयर करत आहे. नुकताच नितीशचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

यामध्ये नितीश खुपच मजेशीर स्टेप करताना दिसून येत आहे. यामुळे या व्हिडिओवर अनेकांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. झी मराठीवरील ‘लागीर झालं जी’ ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. यामुळे त्याला संपूर्ण महाराष्ट्राने डोक्यावर घेतले होते.

या मालिकेत अज्या आणि शीतलीची लव्हस्टोरी आणि एका फौजीची कहाणी चाहत्यांना चांगलीच पसंत पडली होती. यामध्ये नितीश चव्हाणने अज्याची व्यक्तिरेखा साकारली होती. आणि ती खुपच लोकप्रिय सुद्धा झाली होती. या मालिकेमुळे नितीशला खुपच लोकप्रियता मिळाली आहे. तिचे मोठ्या प्रमाणात चाहतेसुद्धा निर्माण झाले आहेत.

नुकताच नितीशने आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेयर केला आहे. त्यामध्ये तो एका डीजे गाण्यावर मजेशीर डान्स करताना दिसत आहे. चाहतेही हा व्हिडीओ पासून खुपच खुश आहेत. नितीशच्या चाहत्यांनी अनेक मजेशीर कमेंट्ससुद्धा केल्या आहेत.

ही मालिका आता बंद झाली आहे. मात्र यामधील कलाकारांची क्रेझ कायम आहे. सध्या नितीश मालिकांपासून दूर असला तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात आहे. नितीश इन्स्टाग्रामवर खुपचं सक्रीय आहे. तो सतत आपले खाजगी फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसाठी शेयर करत असतो.

ताज्या बातम्या

तुमच्या पायाला ‘या’ समस्या जाणवत असतील तर तुम्हाला होऊ शकतो गंभीर आजार, वाचा..

‘गजनी’ चित्रपटातील सुंदर अभिनेत्री आठवते का? आज दिसते ‘अशी’ ओळखणे आहे कठिण

३०० रुपयांची नोकरी ते करोडोंचे मालक, मोठ्या शहरात घरे, विमाने, हेलिकॉप्टर, जाणून घ्या अदानी यांची संपत्ती..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.