मुंबई | कोरोना काळात अनेकांच्या हातचे काम गेले, सर्वच व्यवहार ठप्प झाल्याने लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले, या लॉकडाऊनमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना चिमुकल्यांनी पत्र लिहून घरातील व्यथा सांगितल्याचे आपण वाचलं असेलच. आता एका युवकाने थेट मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र पाठवून अनोखी मागणी केली आहे.
‘एकतर मला नोकरी द्या नाहीतर पोरगी पाहून माझं लग्न करून द्या,’ अशी अनोखी मागणी केली आहे. हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, चर्चेचा विषय ठरलं आहे. गजानन राठोड असे पत्र लिहिणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
“माझं वय 35 वर्ष असून माझं लग्न झालेले नाही. त्याचे कारण गेल्या ७ वर्षांपासून मी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. पण कमी गुणांमुळे मला नोकरी मिळाली नाही. जिथे मुलगी बघायला जातो, तिथे मुलाला नोकरी नोकरी असावी ही अट असते,’ वाशिमच्या गजानन राठोडने पत्रात व्यक्त केली आहे.
पुढे पत्रात लिहिले आहे की, ‘तुम्ही आतापर्यंत नोकरीच्या जागा काढल्या नाहीत, त्यामुळे जॉब मिळणेही कठीण झालं आहे, त्यामुळे मला एकतर जॉब द्यावा अन्यथा माझे एखाद्या मुलीशी लग्न करून द्यावे अशी अजब मागणी या युवकाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
सावधान! बर्ड फ्लूचा विषाणू मानवी शरीरात ‘असा’ करू शकतो प्रवेश? घ्या जाणून
‘राज्यात पोपट मरतात, कावळे मरतात फक्त महाविकास आघाडी सुरक्षित’
…अन् सिरम इन्स्टिट्यूटच्या अधिकाऱ्याला भावना अनावर; ‘आमच्या सर्वांच्या कष्टाचे चीज झाले’