प्रेयसीने जबरदस्तीने केले तरुणासोबत लग्न अन् लैंगिक शोषण; वाशिममधील धक्कादायक घटना

अमरावती | एखाद्या युवतीचे अपहरण करुन तिच्या सहमतीशिवाय लग्न केल्याच्या अनेक घटना आपण ऐकल्या असतील. मात्र हे प्रकरण उलट घडले आहे. २८ वर्षीय युवकाचे प्रेयसीने आणि तिच्या दोन मित्रांनी अपहरण केले आहे.

विशाल (काल्पनिक नाव) हा तक्रारदार युवक आणि त्याची प्रेयसी हे दोघेही मुळचे वाशीम जिह्ल्यातील रहिवासी आहेत. दोघांचे मागील पाच वर्षांपासून लग्न न करण्याच्या अटीवर प्रेमसंबंध होते. मात्र ८ जानेवारी २०२१ रोजी विशालच्या घरी प्रेयसीने दोन युवकांना पाठवून त्याला जबरीने उचलून आणले.

विशालला जबरीने उचलून आणल्यानंतर त्याला मारहाण करण्यात आली. तसेच युवकांनी व प्रेयसीने त्याला आताच्या आताच माझ्याबरोबर लग्न कर अशी मागणी केली. मात्र विशालने नकार दिला तर त्या युवकांनी विशालला मारहाण केली. या प्रकारानंतर विशाल त्याच दिवशी पोलिसांत पोहोचला मात्र त्याने लेखी तक्रार दिली नाही.

विशाल, त्याची प्रेयसी व दोन युवक तेव्हा पोलिस स्टेशनमधून बाहेर पडले. मात्र त्यानंतर पुन्हा ते विशालला जबरीने शहरातील वडाळी परिसरात घेऊन गेले. त्याला मारहाण केली आणि रात्रभर डांबून ठेवण्यात आले. तसेच हे प्रकरण मिटवण्यासाठी दोन लाख रुपये आणि दोन स्टॅप पेपर बोलावून घे अशी धमकी देण्यात आली.

विशालला जानेवारी महिन्यापासून खंडणी मागितली जात होती. शिवाय त्याला सतत माराहाण केली गेली. तसेच युवतीने आपले जबरीने लैंगिक शोषण केले असे विशालने तक्रारीत नमूद केले आहे. दरम्यान याप्रकरणात विशाल विरुद्ध त्याच्या प्रेयसीने मार्च महिन्यात तक्रार केली होती.

प्रेयसीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी विशाल विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली होती. दरम्यान विशाल तब्बल ४० दिवस कारागृहात होता. यानंतर १३ मे रोजी त्याची जामिनावर सुटका झाली होती.

महत्वाच्या बातम्या-
मालाडमध्ये फांदी पडून हेल्मेटचे झाले दोन तुकडे अन् तरुणाचा मृत्यु; थरारक व्हिडिओ आला समोर
रंजीत नाथ: कोरोनाच्या काळात रोज १५० भटक्या कुत्र्यांना बिर्याणी खाऊ घालणारा देवमाणूस
छत्रपतींचे वंशज असलेल्या खासदार संभाजीराजेंच्या मागे मराठा समाज का उभा आहे?

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.