सध्या ‘द कश्मीर फाइल्स'(The Kashmir Files) या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होत आहे. बॉक्स ऑफिसवर देखील या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने दोन गट पडले आहेत. एक गट चित्रपटाच्या बाजूने आहे, तर दुसरा गट चित्रपटाच्या विरोधात आहे. सोशल मीडियावर या दोन्ही गटांमध्ये वाद सुरु आहे. त्याला आता राजकीय रंग मिळाला आहे.(Was Jagmohan responsible for the escape of Kashmiri Pandits?)
काश्मिरी पंडितांच्या पलायनाला नक्की कोण जबाबदार आहे? असा सवाल सध्या समाजमाध्यमांवर उपस्थित होऊ लागला आहे. अनेक पुस्तकांमधून काश्मिरी पंडितांची कैफियत मांडण्यात आली आहे. अनेक राजकीय पक्षांनी या मुद्द्याचा निवडणुकांमध्ये वापर देखील केला आहे. आता या मुद्द्यावर ‘द कश्मीर फाइल्स’ हा विवेक अग्निहोत्री यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट आला आहे.
या चित्रपटावरून काँग्रेस(Congress) आणि भाजपमध्ये(BJP) वाद सुरु झाले आहेत. केरळ काँग्रेसने ट्विट करत काश्मिरी पंडितांच्या पलायनाला भाजप पक्ष कसा जबाबदार होता हे सांगण्याचा प्रयन्त केला. त्यावर भाजपने देखील काँग्रेसला जोरदार प्रत्युत्तर दिले. यावेळी वादात जगमोहन यांचं नाव समोर आलं. जगमोहन हे ११९० साली जम्मू काश्मीरचे राज्यपाल होते.
जगमोहन तीन वेळा खासदार देखील राहिले. प्रथम ते काँग्रेसमध्ये होते नंतर ते भाजपमध्ये आले. जगमोहन यांची काश्मीरमधील कारकीर्द चर्चेची ठरली होती. त्यावेळी जगमोहन यांनी सूत्र हाती घेतल्यानंतर त्यांनी जम्मूमध्ये काश्मिरी पंडितांसाठी तातपुरत्या वस्त्या केल्या होत्या. याकडे दोन्ही बाजुंनी बघणारे गट आहेत. एक गट जगमोहन यांच्यामुळे काश्मिरी पंडितांनी पलायन केले, असे म्हणतो. तर दुसरा गट जगमोहन यांच्यामुळे काश्मिरी पंडित वाचले, असे म्हणतो.
या मुद्द्यावर मरणयातना भोगलेल्या काश्मिरी पंडित पत्रकार आणि लेखक राहुल पंडिता यांनी मत व्यक्त केलं आहे. राहुल पंडिता म्हणाले की, “जेव्हा १९ जानेवारी ११९० मध्ये पंडितांविरोधात काश्मीरमधील मशिदीतून घोषणा सुरु झाल्या. त्यावेळी जगमोहन हे जम्मूतल्या राजभवनात होते. घाबरलेल्या पंडितांनी जगमोहन यांना फोन करण्यास सुरवात केली. ”
राहुल पंडिता पुढे म्हणाले की, “अखेरीस २१ तारखेला जगमोहन हे श्रीनगर मध्ये पोहचले. पण तेव्हापर्यंत पंडितांनी काश्मीरमधून पलायन सुरु केले होते. अनेक पंडित मारले जात होते. जगमोहन यांनी पंडितांना काश्मीर न सोडण्याचे आवाहन केले. पण तोपर्यंत हत्या वाढल्या होत्या आणि पंडितांनी पलायन करण्यास सुरवात केली होती. त्यामुळे तुम्ही कोणत्याही विचारधारेचे असलात तरीही खोटा प्रचार करू नका. ”
“तुम्हाला काहीही माहिती नाही की तेव्हा काय घडलं होतं”, असे पत्रकार आणि लेखक राहुल पंडिता यांनी सांगितले आहे. राहुल पंडित यांनी ‘श्रीनगर टाइम्सचे संपादक गुलाम मुहम्मद सोफी यांनी काश्मिरी पंडितांच्या पलयानाबद्दल दिलेली माहिती देखील सांगितली आहे. “पंडितांसोबत जे काही झालं ते राज्याबाहेर आखल्या गेलेल्या कटाचा भाग होतं”, असे गुलाम मुहम्मद सोफी यांनी सांगितले होते.
“त्यावेळी खोऱ्यात कोणतीही प्रशासन यंत्रणा नव्हती. काश्मीरमधील सगळी पोलीस स्टेशन फुटीरतावाद्यांची केंद्र बनली होती. त्यामुळे जगमोहन त्यावेळी काही करू शकले नाहीत. १९९१ पासून ३२००० पंडितांची घरं जाळली गेली. तीही जगमोहन यांच्यामुळेच का?” , असं गुलाम मुहम्मद सोफी यांनी एका मुलाखतीत म्हंटल होतं.
महत्वाच्या बातम्या :-
महाविकास आघाडीही बदला घेण्याच्या तयारीत; दरेकरांपाठोपाठ ‘या’ भाजप नेत्यावर फास आवळला
सलमान आणि अमिर खानचे चित्रपट बायकॉट करा; ‘द काश्मिर फाईल्स’ पाहून लोकांची मागणी
RTO पथकाच्या हलगर्जीपणामुळे अपघातात शेतकऱ्याचा मृत्यू; लोकांनी पुर्ण पथकालाच चोपले