जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असणाऱ्या वॉरन बफेट यांच्या बर्कशायर हॅथवे इंक या कंपनीने आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. या कंपनीच्या एका शेअरची किंमत तब्बल रु. ३,८२,२३,२५० वर पोहचली आहे. सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे शेअर बाजारात अशांतता असताना वॉरन बफेट यांच्या कंपनीने हे कृत्य केले आहे.(waren bafe -company shear huge price)
बर्कशायरच्या क्लास ए शेअर्समध्ये या वर्षी १० टक्क्यांची वाढ झाली आहे. तर दुसरीकडे स्टँडर्ड अँड पुअर्स ५०० निर्देशांकात १२% वाढ झाली आहे. या कंपनीचे बाजार मूल्य सुमारे ७३१ अब्ज डॉलर्स आहे. ही अमेरिकेतील सहावी सर्वात मोठी कंपनी आहे. १९६५ मध्ये वॉरेन बफेट यांनी या कंपनीची सूत्रे हाती घेतली. त्यावेळी या कंपनीच्या शेअरची किंमत फक्त २० डॉलर होती.
त्यावेळी या कंपनीची स्थिती देखील फारशी चांगली नव्हती. पण आज ही कंपनी Apple Inc., Microsoft Corp., Alphabet Inc., Amazon.com Inc. आणि Tesla Inc यांच्यानंतर सहाव्या क्रमांकावर आहे. वॉरन बफे यांचा कंपनीमध्ये सध्या १६.२ % स्टेक आहेत. गेल्या वर्षी या कंपनीने २७.४६% इतका विक्रमी नफा कमावला होता.
अशा परिस्थितीत ज्या व्यक्तीने या कंपनीत आधी गुंतवणूक केली असेल, तो आज श्रीमंत झाला असेल. ही कंपनी Geico कार विमा, BNSF रेलरोड, रिअल इस्टेट सारखे डझनभर व्यवसाय देखील करते. चीनमध्ये या कंपनीने २०३० पर्यंत ६०० डेअरी क्वीन स्टोअर्स उघडण्याची योजना आखली आहे. अमेरिकेत त्याची सर्वात मोठी बाजारपेठ आहे.
२०२१ वर्षात बर्कशायर कंपनीने १४६.७ अब्ज डॉलरची कमाई केली आहे. बर्कशायर हॅथवे या कंपनीचे मुख्यालय अमेरिकेतील ओमाहा येथे आहे. ही कंपनी अनेक उपकंपन्यांचे व्यवस्थापन आणि देखरेख करते. वॉरन बफेट कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. या कंपनीने मागील वर्षात चांगला नफा कमविला आहे.
या कंपनीचा बहुतांश व्यवसाय अमेरिकेत आहे. या कंपनीमध्ये सुमारे ३,७२,००० कर्मचारी आहेत. त्यापैकी ७७ टक्के कर्मचारी अमेरिकेतील आहेत. २०२१ च्या वर्षात कंपनीने Occidental Petroleum Corp मध्ये ५ बिलियन डॉलर पेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे. शेअर बाजारात सध्या अस्थिरता असूनही वॉरन बफेट यांच्या बर्कशायर हॅथवे कंपनीने दिमाखदार कामगिरी केली आहे.
महत्वाच्या बातम्या :-
पट्ठ्याने करून दाखवलं! २४८ गुण मिळवून झाला PSI; गरीब बापाने चक्क घोड्यावरून काढली मिरवणूक
तुम्ही द काश्मिर फाईल्स पाहिला का? आता काय करत आहे 20 जणांचा मारेकरी बिट्टा कराटे?
अबब! ३.८ कोटी रुपयांचा एक शेअर, ‘या’ अब्जाधीशाच्या कंपनीने गुंतवणूकदारांना केले करोडपती