मोठी बातमी! वर्धा नदीत बोट उलटली, ११ जणांचा पाण्यात बुडून मृत्यु

वर्धा जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वर्धानदीमध्ये एक बोट उलटल्यामुळे एक मोठी दुर्घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यु झाल्याची माहिती समोर आली आहे.

मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. बेनोडा पोलिस स्टेशन अंतर्गत वरुड तालुक्यातील झुंझ गावाजवळ ही घटना घडली आहे. पण ही बोट नक्की कोणत्या कारणामुळे उलटली याबाबत अजूनही काही माहिती मिळालेली नाही.

गेल्या आठ दिवसांपासून वर्धा जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस सुरु आहे. नद्याही ओसंडून वाहत आहे. असे असताना नदीच्या एका किनाऱ्यावरुन दुसऱ्या किनाऱ्यावरुन जाताना ही बोट उलटली आहे. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवल्याने ही बोट उलटली असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

या बोटीची क्षमता नसतानाही या बोटीमध्ये २० जणांहून अधिकजण बसवण्यात आले होते. अशावेळी बोट नदीच्या मधोमध आली असताना अचानकच वजनामुळे बोटीचा तोल गेला आणि ही बोट उलटली आहे.

या घटनेची माहिती मिळताच तिथल्या स्थानिक नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. तसेच त्यानंतर तातडीने मदतकार्य सुरु करण्यात आले होते. त्यामधून काही प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले होते. तर तीन प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. अजूनही आठ जणांचा शोध सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका कुटुंबातील काही जण सकाळी १० वाजण्याच्या सुमारास गाडेगाव येथे दशक्रिया विधीसाठी आले होते. तो दशक्रिया विधी आटपून ते वरुडच्या दिशेने परत निघाले होते. त्याचवेळी ही दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यु झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या-

”पंतप्रधान जर विदेशातही हिंदीत बोलतात, तर आपल्याला का लाज वाटते?’ अमित शहांचा सवाल
विराट कोहली देणार कर्णधारपदाचा राजीनामा? बीसीसीआयकडून मोठा खुलासा..
नाद खुळा! ३ कोटींचं कर्ज फक्त १७ महिन्यात फेडलं; महिलेने सांगितली पैसे बचतीची भन्नाट आयडिया

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.