मोठी बातमी! वारकरी, कीर्तनकारांना आता महिन्याला पाच हजार मानधन, सरकारचा मोठा निर्णय

मुंबई । कोरोनामुळे अनेकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेकांचे रोजगार गेले आहेत. यामुळे पोटाचा प्रश्न निर्माण झाला आहे. असे असताना आता शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. कोरोना संसर्गाच्या काळात अडचणीत आलेल्या महाराष्ट्रातील ४८ सहस्र कलावंतांना मानधन देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

त्यांना प्रतिमाह ५ सहस्र रुपयांचे मानधन देण्याचा निर्णय सांस्कृतिक कार्य मंत्रालयाने घेतला होता. यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यात आता वारकरी संप्रदायाचाही समावेश करण्यात आला आहे. यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोरोना काळात त्यांची मोठी अडचण निर्माण झाली होती. आता वारकरी संप्रदायातील कीर्तनकार, गायक आणि पखवाजवादक यांनाही आता ५ सहस्र रुपयांचे मानधन प्रतिमाह देण्यात येणार आहे. अनेक दिवसांपासून ही मागणी केली जात होती.

वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्यासमवेत बैठक घेतली होती. या वेळी विठ्ठल पाटील यांनी कोरोना संसर्गाच्या काळात वारकरी संप्रदायाची दुरवस्था झाल्याचे शासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. आणि मदतीची मागणी केली होती.

तसेच त्यांनी राज्यातील कलावंतांमध्ये वारकरी संप्रदायाचा समावेश करण्याची मागणी केली होती. यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे आता लवकरच त्यांना पैसे देखील मिळणार आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.