शेअर बाजारातून पैसे कमवायचे आहेत? समजून घ्या ‘ह्या’ महत्वाच्या टिप्स…

 

मुंबई | जर तुम्हाला कोणता व्यवसाय करायचा असेल तर अनेक आव्हाने तुमच्या समोर येत असतात. तसेच व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला फक्त कौशल्य आणि ज्ञानाची नाही तर भांडवलाची पण गरज असते.

पैसा कमवायचा असेल तर व्यवसाय करणे हाच एक पर्याय लोकांना दिसत असतो, पण त्यापेक्षाही एक वेगळा मार्ग आहे. तो म्हणजे शेअर मार्केट.

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुमच्याकडे फक्त योग्य कौशल्य आणि ज्ञान असायला हवे यांच्या बळावर तुम्ही मोठी संपत्ती उभारू शकतात.

तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये नवीन असाल किंवा जर शेअर मार्केट मध्ये उतरण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी काही महत्वाच्या टिप्स:-

मूलभूत गोष्टी जाणून घ्या:- कोणतीही एखादी गोष्ट शिकून घेण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी तिचे मूलभूत नियम जाणून घेण्याची गरज असते, गुंतवणूकीचेही त्याचप्रमाणे आहे.

सुरुवातीला तुम्ही विद्यार्थी बनणे आवश्यक आहे. प्रत्येक आवश्यक गोष्ट शिका. शेअर बाजाराबद्दल मूलभूत गोष्टी शिकण्यासाठी इंटरनेटवर भरपूर शोध घ्या. तुमचे डिमॅट खाते सांभाळणाऱ्या ब्रोकरकडूनही तुम्ही खूप माहिती मिळवू शकता.

गुंतवणुकीची रक्कम ठरवा:- इक्विटीमध्ये तुम्हाला किती विस्तार हवा आहे, हे जाणून घेणे आवश्यक असते. आपण तरुण गुंतवणूकदार असल्यास, तुमच्यासमोर अजून ३० वर्षे कामाचा अवधी शिल्लक आहे.

त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी जास्त पैसे गुंतवा. विविध क्षेत्रांशी संबंधित शेअर्सचा मोठा पोर्टफोलिओ तुम्ही तयार करू शकता. पण तुमचे वय जर ५० च्या जवळपास असेल तर शेअर बाजारात प्रवेश केला तर खबरदारी बाळगणे आवश्यक आहे. त्यामुळे स्थिर परतावा देणाऱ्या स्टॉकमध्येच पैसा तुम्ही गुंतवा.

अचूक वेळ साधने गरजेचे:- गुंतवणुकीचा विचार केल्यावर, योग्य वेळ हेच सर्वकाही असते. तुमची योग्य आरओआय (रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट) मिळवण्याची संधी पूर्णपणे यावर अवलंबून असते.

असे म्हटले जाते की, शेअर्स जेव्हा अगदी निच्चांकी पातळीवर व्यापार करतात, तेव्हा बाजारात प्रवेश करणे महत्त्वाचे ठरते असते. त्याचप्रमाणे, किंमती उच्चांकी स्थितीत असतात, तेव्हा बाहेर पडणे उत्तम असते. मात्र, तुम्ही शेअर्सवर पैसा लावण्यापूर्वी तुमचा उच्चांक ठरलेला असावा.

चुकांमधून शिका:- बऱ्याचवेळा लोक चुकीच्या कंपनीत गुंतवणूक करतात, आणि त्यांना त्यात तोटा होतो, मात्र चुकांमुळे निराश होऊ नका.

तुमच्या पोर्टफोलिओचे नियमितपणे निरीक्षण करा आणि चुका ओळखायला शिका. असे केल्याने भविष्यात एकच चूक पुन्हा पुन्हा करणे टाळता येईल.

तसेच अधिक अनुभव मिळवण्यासाठी तुम्ही विविध क्षेत्रांत गुंतवणूक केली पाहिजे, त्या व्यापारातून जास्तीत जास्त शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असे म्हणतात की, प्रोफेशनल ट्रेडर्सदेखील चुका करतात. म्हणून चूक झाल्यावर निराश होऊ नका.

तुमच्या वित्तीय उद्दिष्टांबद्दल स्पष्ट रहा:- गुंतवणुक करताना, तुम्ही आपले उद्दिष्ट आणि भविष्यात आपल्याला रक्कम पुन्हा कधी हवी आहे, त्या संभाव्य काळाबद्दल स्पष्टता राखायला हवी.

तुम्हाला तुमचा आरओआय काही वर्षातच हवा असेल तर कमी अस्थिर शेअर्समध्ये गुंतवणूक केली पाहिजे. मात्र तुम्हाला दीर्घकालीन योजना हवी असेल, जसे की, तुमच्या मुलांचे परदेशात शिक्षण किंवा स्वप्नातील घर विकत घेणे, तर तुम्ही त्यानुसार, गुंतवणूक केली पाहिजे.

अंतिम सूचना:- गुंतवणूकदार म्हणून, सेक्टर्स आणि शेअर्सबद्दल सखोल माहिती घ्या, तुमच्या वैयक्तिक आणि व्यवसायिक गरजा जाणून घेणेही आवश्यक आहे.

सर्व कंपन्या लाभदायक नसतात, हे तुम्हाला कळेलच. त्यामुळे तुम्ही अभ्यासाने निवड करणे आणि माहितीपूर्ण निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. आपण योग्य प्रयत्नांसह संशोधन केले तर एक चांगली सुरुवात करता येईल.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.