निकाहाचे फोटो पोस्ट करणाऱ्या मलिकांना वानखेडेंचे सडेतोड प्रत्यूत्तर; केले असे काही की…

मुंबई । राज्यात गेल्या काही दिवसांपासून एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री नवाब मलिक यांच्यात वाद सुरू आहे. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. मलिक यांनी वानखेडे यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

रात्री मलिक यांनी एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोवरून आता समीर वानखेडे हे खरंच मुस्लीम आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. हा फोटो समीर वानखेडे यांचा आहे.

यामध्ये ते मुस्लीम वेशात दिसून येत आहेत. कबूल, कबूल, कबूल असे मलिक यांनी म्हणत हा फोटो ट्विट केला आहे. याबाबत वानखेडे यांनी आपला धर्म मुस्लीम नसल्याचा दावा केला आहे. यामुळे मलिक यांनी यावर आक्षेप घेतला आहे.

याला उत्तर म्हणून आता ज्ञानदेव वानखेडे यांनी समीर वानखेडे हिंदू धर्माचे पालन करत असल्याचे काही फोटो शेअर केले आहेत. आपण मुस्लिम नसून हिंदू आहोत, असे वानखेडे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणी कोर्टात खटला देखील सुरु आहे.

नवाब मलिक यांनी त्यांच्या शाळेचे दाखले देखील समोर आणले आहेत. ज्यामध्ये काही ठिकाणी त्यांचे नाव समीर ज्ञानदेव वानखेडे धर्म हिंदू, तर काही ठिकाणी समीर दाऊद वानखेडे धर्म मुस्लीम असे आहे. यामुळे यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. केंद्र सरकार आता त्यांच्यावर काय कारवाई करणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

याबाबत नवाब मलिक रोज काही ना काही पुरावे देत आहेत. या फोटोमध्ये समीर वानखेडे लग्नातील खुर्चीवर बसले आहेत. त्यांच्या बाजूला बसलेले एक मुस्लीम गृहस्थ हातातील कागदपत्रांवर त्यांच्या सही घेताना दिसता आहेत. यामुळे संशय व्यक्त केला जात आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.