Homeराजकारण“मी वाटेल ते करेल मला कोण काहीच बोलणार नाही असे वानखेडेंना वाटायचे,...

“मी वाटेल ते करेल मला कोण काहीच बोलणार नाही असे वानखेडेंना वाटायचे, तेच त्यांना नडले”

गेल्या काही महिन्यांपासून,एनसीबीचे तपास अधिकारी समीर वानखेडे आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यातील वादप्रतिवादांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. समीर वानखेडे हे आयआरएस अधिकारी असून ते मुंबईतील क्रूझ ड्रग्स प्रकरणाच्या तपासामुळे प्रसिद्धीच्या झोतात आले होते. याच समीर वानखेडे यांची बदली झाली आहे. यावर नवाब मलिक यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

आर्यन खानच्या अटकेपासून समीर वानखेडे चांगलेच चर्चेत राहिले होते. पण याच दरम्यान त्यांच्यावर प्रचंड टीका देखील झालेल्या पाहिला मिळाल्या. नुकतीच समीर वानखेडे यांची बदली झाली,आणि नवाब मलिक यांनी त्याबद्दल प्रतिक्रिया देत पुन्हा एकदा समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधला आहे. नवाब मलिक म्हणाले, समीर वानखेडे यांनी जो काही फर्जीवाडा केला आहे, त्याबद्दल आम्ही तक्रार केली असून, कारवाई सुरु आहे. जात पडताळणी समिती याबाबत चौकशी करत आहे.

लवकरच त्यावर निर्णय येईल आणि समीर वानखडे यांनी खोटी प्रमाणपत्र जमा केल्याचे समोर येईल. युपीएससीच्या नोकरीत असताना त्यांनी स्वतःच्या नावाने सदगुरु बारचा परवाना घेतला होता. दुसऱ्या लग्नानंतर त्यांनी पत्नीचा व्यवसाय आणि संपत्तीबद्दल माहिती लपवली होती. याबद्दल तक्रारी केल्यांनतर तपास सुरु आहे. ज्या तक्रारी मी केल्या होत्या, त्याचा पाठपुरावा मी करणार आहे. तक्रारी सिद्ध झाल्यानंतर नक्कीच त्यांच्यावर कारवाई होईल याची मला खात्री आहे. असे नवाब मलिक म्हणाले.

समीर वानखेडे चुकीच्या पद्धतीने कारभार करत होते. मला वाटेल ते मी करेल मला कोणीच बोलणार नाही, असा त्यांचा गाफीलपणा होता. हाच गाफीलपणा त्यांना नडला. एखाद्या अधिकाऱ्याने मर्यादा सोडून काम केले कि त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. वानखडे यांनी पदाचा वापर करून जो गैरफायदा घेतला त्याबद्दल त्यांच्यावर कारवाई नक्कीच होईल. असेही नवाब मलिक यावेळी बोलले.

वानखेडेंना मुदतवाढ देण्यात येऊ नाही, अशी मागणी केली होती. अखेर केंद्र सरकारने त्यांना मुदतवाढ न देता बदली केली, हा निर्णय योग्य घेतला. समीर वानखेडे यांना एनसीबी मध्ये मुदतवाढ देण्यात यावी, यासाठी भाजपने लॉबिंग केले होते, मात्र त्यांना मुदतवाढ मिळाली नाही. जे कोणी लॉबिंग करत होते त्यांनी माघार घेतल्याचे दिसत आहे, त्यामुळे त्यांची नावं सांगून फायदा नाही. वानखेडेंची जर बदली झाली नसती तर भाजपच्या नेत्यांच्या नावांचा खुलासा केला असता. असे मलिक म्हणाले.

आर्यन खान प्रकरणाबाबत मलिक यांनी सांगितले कि, आर्यन खान प्रकरणात जे खडले त्याचा एसआयटीच्या माध्यमातून तपास सुरु आहे. तपासात काही अडल्यास किंवा तपास थांबवल्यास आम्ही जाब विचारू, आणि जर कुणी अधिकारी लोकांना माझ्याविरोधात तक्रार करायला लावत असतील, तर त्याबाबत कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे मलिक यांनी यावेळी सांगितले.

महत्वाच्या बातम्या
६० हजार कोटींचा घोटाळा करणाऱ्या पर्ल ग्रुपच्या चेअरमनचा तुरूंगातच मृत्यु, वाचा ‘त्या’ घोटाळ्याबद्दल..
प्रेमात धोका मिळाल्यामुळे अवघ्या १७ वर्षीय मुलाची तलावात उडी मारून आत्महत्या