‘मुंबईमध्ये वानखेडेंचे बार आहेत, त्यांची नोकरी जाणार हे आता निश्चित झाले आहे’

मुंबई । महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा समीर वानखेडेविरोधात आरोप मालिका सुरूच ठेवली आहे. आता मलिक म्हणाले की, समीर वानखेडे यांची नोकरी जाणार हे नक्की आहे. मलिक म्हणाले की, समीर वानखेडेने एकापाठोपाठ एक अनेक फसवणूक केली आहे. या फसवणुकीत त्याच्या वडिलांचाही सहभाग आहे.

मलिक म्हणाले समीर वानखेडे एका बारचे मालक आहेत. वानखेडे हे मुंबईमधील एका बारचे मालक असून त्याचा परवाना वानखेडेंच्या नावे आहे. एक सरकारी अधिकारी असून अशा प्रकारे फसवणूक करणे योग्य नाही. यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. याबाबत वानखेडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

वानखेडे म्हणाले की, आपण भारतीय महसूल सेवेमध्ये रुजू झाल्यापासून हा परवाना आपल्या नावे आहे. याचे कायदेशीर हक्क हे समीर यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांच्याकडे देण्यात आले आहेत. यामध्ये बेकायदेशीर असे काहीच नाही. २००६ सालापासून या बारचा उल्लेख माझ्या वर्षीक स्थावर मालमत्तेमध्ये करत आहे.

तसेच या उद्योगामधून मिळणाऱ्या कामाईचा सर्व उल्लेख मी प्राप्तीकर परताव्याच्या कागदपत्रांमध्ये केला आहे. यामुळे वानखेडे यांनी देखील त्यांची बाजू मांडली आहे. वानखेडे यांचा हा बार वाशी येथे आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या अहवालानुसार वाशीमधील सद्गुरु हॉटेलचा परवाना वानखेडे यांच्या नावे आहेत.

हा परवाना २७ ऑक्टोबर १९९७ रोजी जारी करण्यात आला आहे. तसेच २०२२ पर्यंत तो पात्र आहे. या बारमध्ये परदेशी तसेच भारतीय बनावटीच्या दारुची विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. याबाबत सगळी माहिती मलिक यांच्याकडे आहे.

याबाबत हे पुरावे समीर वानखेडे यांची नोकरी जाण्यासाठी पुरेसे आहेत. तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना शिक्षा व्हावी. केंद्र सरकारने आता समीर वानखेडे यांच्या कृत्याकडे
लक्ष दिले नाही तर तेही समीर वानखेडे यांच्या पाठीशी असल्याचे सिद्ध होईल, असे मलिक यांनी म्हटले आहे. यामुळे आता काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.