कोरोनाग्रस्त पत्नीला बेड मिळण्यासाठी जवानाची वणवण भटकंती, म्हणाला, मी देशासाठी मरतोय आणि..

रिवा । भारत देशात सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी मोठा आदर, प्रेम व्यक्त केले जाते. त्यांच्यासाठी अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. असे असताना एक धक्कादायक घटना समोर आली आहे. देशात कोरोनाने हाहाकार उडवला आहे.

मध्य प्रदेशातल्या रिवा जिल्ह्यातील एका जवानाचा व्हिडीओ समोर आला आहे. सीमा सुरक्षा दलात कार्यरत असलेल्या जवानाच्या पत्नीला कोरोनाची लागण झाली आहे. जवान आपल्या पत्नीला घेऊन वणवण फिरत आहे. मात्र बेड मिळत नाही.

हा जवान कोरोनाग्रस्त पत्नीला घेऊन कारमधून एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात फिरत आहे. आठ तासांपासून त्याची वणवण सुरू आहे. पत्नीला कुठे दाखल करावे, याची माहिती कोणीही जवानाला देत नाही. यामुळे या जवानांचे मोठे हाल सुरू आहेत. माध्यमांच्या प्रतिनिधींकडे त्याने आपली व्यथा मांडली.

त्यानंतर त्याच्या पत्नीला संजय गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा जवान पत्नीला कोरोनाची लागण झाल्याने अवघ्या चारच दिवसांपूर्वी घरी परतला. त्याआधी तो त्रिपुरामध्ये कर्तव्य बजावत होता. जवानाने कोरोनाची लस घेतली आहे. तो घरी आल्यावर पत्नीची प्रकृती बिघडली होती.

तिची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. पत्नीला रुग्णालयात दाखल करण्यासाठी त्याची वणवण सुरू होती. अनेक रुग्णांमध्ये जाऊनही त्याला मदत मिळाली नाही. पत्नीला कारमध्ये ठेवून तो प्रत्येक रुग्णालयात जाऊन विचारणा करत होता.

बेड उपलब्ध होत नसल्याने जवान अतिशय हतबल झाला होता. त्याला अश्रू अनावर झाले. ‘आजारी पत्नीला घेऊन मी भटकत आहे. तिला कुठे उपचार मिळतील? तिला मी कुठे दाखल करू? मी देशासाठी मरतो. पण माझ्या पत्नीला उपचार मिळत नाही, असे म्हणत जवानाने आक्रोश केला.

ताज्या बातम्या

या चिमुकल्याचा नादच नाय! इंटरनेटचा वापर करून महिन्याला कमावतोय लाखो

मयुरचं नशीबचं! रेल्वेकडून ५० हजार बक्षीस, तर जावा कंपनीकडून शानदार मोटरसायकल भेट

सेल्फी घेतोय म्हणत त्याने भर विमानतळावर घेतला अभिनेत्रीचा किस; पाहा व्हिडिओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.