गणपतीची पूजा केल्याने शाहरुख खानचा मुलगा अबराम झाला ट्रोल, जाणून घ्या, काय आहे प्रकरण…

मुंबई । सध्या गणपती उत्सव साजरा केला जात आहे. कोरोनाचे सावट असले तरी उत्साहाने हा सण साजरा केला जात आहे. बॉलिवूडमध्ये देखील अनेक कलाकार त्यांच्या घरी गणपती बाप्पाचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करतात. याचे फोटो देखील व्हायरल होत असतात. मात्र काहीवेळेस कलाकारांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.

आता मात्र शाहरुख खानने गणपती बाप्पाची पूजा अर्चना केल्यामुळे त्याला पण ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. शाहरूखच्या घरी सगळे सण उत्साहाने साजरे केले जातात. शाहरूख सोशल मीडियावर सक्रिय असून कोणताही सण असला की तो सोशल मीडियावर फोटो शेअर करत सगळ्यांना शुभेच्छा देतो.

काही कट्टरपंथी लोकांनी शाहरुखला गणेशोत्सव साजरा केल्यामुळे ट्रोल केले होते. यम आता चर्चा सुरू झाली आहे. त्याने त्याचा लहान मुलगा अबरामचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्या फोटोत शाहरुख खानचा लहान मुलगा अबराम गणपती बाप्पाच्या मूर्तीपुढे हात जोडून उभा होता.

‘आमचे गणपती पप्पा, घरी आले आहेत, माझा छोटा मुलगा त्यांना याच नावाने हाक मारतो, असे शहरुखने म्हटले आहे. फोटो पाहिल्यानंतर अनेकांनी शाहरुखचा मुलगा अबरामला ट्रोल केले. अनेकांनी शाहरुखला ‘तू पाप करत आहेस’, असे म्हटले आहे.

तू हे चुकीच करत आहेस’, असे सांगितले. हे कमेंट करून ट्रोल करणारे बहुतांश कट्टर इस्लामिक असल्याचे दिसून आले. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे. तो पाकिस्तानचे गुणगान गातो, असे म्हणत देखील तो सतत ट्रोल होत असतो. यामुळे तो सतत चर्चेत असतो.

अनेक कलाकार आणि त्यांची मुलं देखील वेगवेगळ्या कारणाने सतत ट्रोल होत असतात. शाहरुख खान वेगवेगळ्या वक्तव्यामुळे देखील सतत चर्चेत असतो. आता त्याचा मुलगा चर्चेत आला आहे. त्याचा फोटो सध्या व्हायरल होत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.