Share

Walmik Karad: “वाल्मिक कराडने तिघांची हत्या केली, त्याच्या टेबलवर कातडी अन् हाडं…”; जुना सहकारीच बनला साक्षीदार

Walmik Karad:  बीड (Beed) जिल्ह्यातील बहुचर्चित संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणात आता नवा वळण आलं आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड (Walmik Karad) याच्यावर त्याच्याच जुन्या सहकाऱ्याने गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. विजयसिंह बाळा बांगर (Vijaysingh Bangar) यांनी पत्रकार परिषद घेऊन काही धक्कादायक खुलासे केले आहेत.

महादेव मुंडेंच्या हत्या प्रकरणात कराडवर थेट आरोप

महादेव मुंडे (Mahadev Munde) यांची हत्या झाल्यानंतर त्यांचे शरीराचे अवशेष, कातडं, हाडं आणि रक्त हे वाल्मिक कराड (Walmik Karad) यांच्या टेबलावर ठेवण्यात आले होते, असा गंभीर आरोप बांगर यांनी केला. एवढंच नव्हे, तर त्यांनी सांगितले की, कराडने त्या हत्येमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींना गाडीच्या स्वरूपात बक्षीस दिलं आणि शाबासकीही दिली.

“कराडने मला सरपंचाच्या हत्येच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली होती”

विजयसिंह बांगर यांनी दावा केला की, संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येच्या आधीच कराडने त्यांना फोनवर “तुला एका सरपंचाच्या खुनात अडकवेन” असं म्हणत धमकावलं होतं. त्यामुळे त्यांच्यातील मतभेद अधिक वाढले आणि कराडने बांगर यांना फसवून गुन्ह्यात अडकवलं, असंही ते म्हणाले.

कॉल रेकॉर्डिंगमधून जातीय शिवीगाळ

पत्रकार परिषदेत बांगर (Bangar) यांनी एक कॉल रेकॉर्डिंगही सादर केलं ज्यामध्ये वाल्मिक कराड (Karad) एका व्यक्तीला उद्देशून अत्यंत जातीवाचक शब्दांत शिवीगाळ करत असल्याचं स्पष्ट ऐकू येतं. त्या व्यक्तीने कराडकडे कामासाठी २५ लाख रुपये दिले होते, परंतु पैसे परत न दिल्यामुळे वाद निर्माण झाला. कराडने त्या व्यक्तीला खंडणीच्या गुन्ह्यात अडकवलं, आणि तसाच प्रकार बांगर यांच्यासोबतही केला होता, असं त्यांनी स्पष्ट केलं.

विजयसिंह बांगर (Vijaysingh Bangar) यांनी म्हटलं की, त्यांच्या ताफ्यातील सर्व पुरावे, कॉल रेकॉर्डिंग्स आणि माहिती लवकरच मुख्यमंत्री (Chief Minister), उपमुख्यमंत्री (Deputy CM) आणि जिल्हा पोलीस अधीक्षक (SP Beed) यांच्याकडे सादर केली जाणार आहे.

ताज्या बातम्या क्राईम

Join WhatsApp

Join Now