वेटरचे काम करून दिवसरात्र अभ्यास केला आणि कलेक्टर झाला; वाचा जय गणेशची यशोगाथा

आपण अनेक जणांच्या प्रेरणादायी कथा ऐकल्या असतील. त्यातून अनेक जणांना प्रेरणा मिळत असतात. एखाद्या ध्येयापर्यंत पोहोचायचे असेल तर अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

अनेक जण कष्ट करत असतात, अशीच एक कहाणी जाणून घेणार आहोत. तामिळनाडूमधील उत्तर अंबरजवळील एका लहानशा गावात गरीब कुटुंबातील जय गणेश यांची गोष्ट सांगणार आहोत.

जय गणेश यांचा जन्म तमिळनाडूमध्ये एका लहानशा गावात त्यांचा जन्म झाला. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. त्यांचे वडील एका कखान्यात काम करून त्यांच्या घरच्यांचे पालनपोषण करत असत.

त्यांना आपल्या गावची मदत करण्याची खूप इच्छा होती. दहावी पास झाल्यानंतर त्यांनी पॉलिटेक्निकला प्रवेश घेतला आणि ते चांगल्या गुणांनी उत्तीर्ण पण झाले. त्यानंतर त्यांनी पदवीचे शिक्षण पण पूर्ण केले.

त्यांना त्यानंतर त्यांनी एक जॉब केला. मात्र त्यांना त्या जॉबमध्ये तुटपुंजे पेमेंट मिळत असल्यामुळे आयएएस बनण्याचे स्वप्न त्यांनी मनाशी बांधले. त्यांनी युपीएससीच्या परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली.

मात्र हा रस्ता म्हणावा तेवढा सोपा नव्हता. जय गणेश हे यूपीएससीच्या परीक्षेत नापास झाले मात्र टेलिजन्स ब्युरोच्या परीक्षेत ते पास झाले. त्यांनी हे पद सोडून यूपीएससीची सातव्यांदा परीक्षा दिली आणि त्यात १५६ वा क्रमांक मिळवून पास पण झाले. त्यांनी त्यांच्या इच्छाशक्तीवर विजय मिळवला.

ताज्या बातम्या
“आजोबांनी आयपीएल आणून चीअरलीडर्स नाचवल्या, नातू कोविड सेंटरमध्ये नाचतो”

परिस्थितीला हरवत ऊसतोड कामगाराचा मुलगा डॉक्टर बनला; पण कोरोनाची लढाई हरला

व्हाट्स अँपने भारत सरकारच्या विरोधात ठोठावला न्यायालयाचा दरवाजा; घ्या अधिक जाणून

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.