क्रूरतेचा कळस! गर्भवती वाघीणीला जिवंत जाळले; वाघीनीच्या पोटात होती चार पिल्ले

यवतमाळ | भारतात वन्य प्राण्यांची शिकार करणं गुन्हा आहे. मात्र तरीही प्राण्यांच्या शिकार होण्याच्या घटना कमी होत नाही. वाघांच्या शिकार होण्याचं प्रमाणही वाढत आहे. अशातच यवतमाळमध्ये एक क्रुरतेचा कळस गाठणारी घटना घडली आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वनविभागाअंतर्गत मुकु टबन परिक्षेत्रातील मांगुर्ला नियतक्षेत्रातील राखीव वनक्षेत्र क्र. ३० मध्ये वनविभागाचा कर्मचारी गस्त घालत होता.  त्यावेळी त्याला एका वाघिणीची अत्यंत निर्घूणपणे शिकार केली असल्याचं निदर्शनास आलं.

वनरक्षकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिल्यावर अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता एका ४ वर्षाच्या वाघिणीची शिकार झाली असल्याचं समजलं. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे वाघिणीच्या पोटात चार पिल्ले होती.

पांढरकवडा वनपरिक्षेत्रामध्ये एका छोट्याशा गुहेमध्ये वाघिण राहत होती. वाघिण गुहेतच असल्याचा फायदा शिकाऱ्यांनी घेतला  आणि त्यांनी वाघिणीला गुहेतून बाहेर पडता न यावं यासाठी बांबू, काठ्यांनी गुहा बंद करून टाकली.

त्यानंतर शिकाऱ्यांनी गुहेच्या प्रवेशद्वाराजवळ आग लावली. आगीने वाघिण तडफडत होती.  वाघिण जीवंत आहे का मेली हे पाहण्यासाठी गुहेच्या आत बांबू, काठ्या टाकल्या. यावेळी त्यांनी बांबू, काठ्यांना आग लावली होती. आगीमुळे वाघिणीने आपले प्राण सोडले. वाघिण मृत झाल्याची संधी साधून शिकाऱ्यांनी तिचे पाय कापून नेले आहेत.

दरम्यान गेल्या वर्षी जुलै महिन्यात महाराष्ट्रातील वाघांच्या संख्येचा अहवाल मांडण्यात आला. यामध्ये राज्यातील सहा व्याघ्र प्रकल्पांमध्ये ३१२ वाघ असल्याचं अहवालात नमुद करण्यात आलं होतं.
महत्वाच्या बातम्या-
मोठ्या मनाचा आमदार! मुलाचे लग्न साधेपणाने करत वाचलेल्या पैशातून करणार लोकांचे लसीकरण
कुटुंब कोरोनाविरूद्ध लढा देतयं, मी त्यांच्यासोबत राहीलं पाहीजे; म्हणत अश्विनने सोडली आयपीएल
कोरोना संकटात हजारो लोकांना जेवन पुरवणारा सलमान स्वत: गेला जेवनाची टेस्ट घ्यायला

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.