व्हीव्हीएस लक्ष्मणला सोडावे लागणार हैदराबाद, कुटुंबावर होणार ‘हा’ मोठा परिणाम, कमाई होणार कमी

‘राहुल द्रविड’ची टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यापासून तो ही जबाबदारी सांभाळत आहे. आतापर्यंत राहुल राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा (NCA) प्रमुख म्हणून काम पाहत होता. आता ही जबाबदारी भारताचा माजी फलंदाज ‘व्ही.व्ही.एस. लक्ष्मण’ यांच्याकडे सोपवली जाईल.

बीसीसीआयने या प्रकरणाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नसली तरी त्याचे अध्यक्ष ‘सौरव गांगुली’ यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना एनसीएचे पुढील अध्यक्ष लक्ष्मण असतील असे सांगितले आहे. राहुल आणि लक्ष्मण भारतीय क्रिकेटमधील दोन प्रभावशाली पदांवर काम करतील याचा गांगुली यांना खूप आनंद आहे.

ते म्हणाले, या दोघांच्या येण्याने भारतीय क्रिकेट सुरक्षित हातात असेल. लक्ष्मणला एनसीएचे अध्यक्ष बनण्यासाठी कोणती किंमत मोजावी लागेल हेही गांगुलीने सांगितले. त्यांनी सांगितले की लक्ष्मण आणि त्यांचे कुटुंब पुढील तीन वर्षांसाठी हैदराबादहून बेंगळुरूला शिफ्ट होणार आहे.

बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष असताना गांगुली यांनी लक्ष्मण यांच्याकडे राज्य युनिटच्या ‘व्हिजन २०२०’ या प्रकल्पाची जबाबदारी सोपवली होती. गांगुली यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, “मला खूप आनंद झाला की त्यांची मुख्य प्रशिक्षक आणि एनसीए प्रमुख म्हणून नियुक्ती झाली आहे. ही दोन्ही भारतीय क्रिकेटमधील अत्यंत महत्त्वाची पदे आहेत.”

दोघांचे मन वळवणे किती कठीण आहे, असे विचारले असता गांगुली म्हणाले, “त्यांना हे महत्त्वाचे असल्याचे सांगण्यात आले आणि त्यांनी ते मान्य केले. दोघांची नियुक्ती झाल्यामुळे आम्हाला आनंद होत आहे आणि भारतीय क्रिकेट आता सुरक्षित हातात आहे. मला आनंद आहे की दोघांनी सहमती दर्शवली आहे आणि त्यांना हे भारतीय क्रिकेटसाठी करायचे आहे.”

गांगुली म्हणाले की, लक्ष्मणचा एनसीए प्रमुख म्हणून निवडीमुळे मोठा फरक पडेल कारण तो एक उत्कृष्ट माणूस आहे आणि भारतीय क्रिकेटमध्ये त्याचा उच्च दर्जा आहे. “लक्ष्मणच्या वचनबद्धतेमुळे त्याची निवड केली जाईल. त्याच्यासोबत काम करणे नेहमीच छान असते. भारतीय क्रिकेटमध्ये त्याचे मोठे स्थान आहे. राहुलने एनसीएमध्ये एक यंत्रणा बनवली आहे आणि लक्ष्मण ती सुरू ठेवणार आहे.

भारतीय क्रिकेटची सेवा करण्यासाठी तो पुढील तीन वर्षांसाठी हैदराबादहून बंगळुरुला स्थलांतरित होत आहे, ही बाब उल्लेखनीय आहे. त्याची कमाई कमी होईल पण तरीही तो तयार आहे. त्याची बायको आणि मुलंही शिफ्ट होतील. त्याची मुले आता बंगलोरमध्ये शिकणार आहेत आणि नवीन वातावरणाशी जुळवून घेणे कुटुंबासाठी एक मोठा बदल असेल.

जोपर्यंत तुम्ही भारतीय क्रिकेटला समर्पित होत नाही तोपर्यंत हे करणे सोपे नाही. गांगुली म्हणाले की लक्ष्मणने या पदासाठी सनरायझर्स हैदराबादचा आयपीएलमध्ये मेंटॉर या पदावर आधारित कॉमेंट्रीचा करार आणि इतरही संस्थांचे कॉलम लिहिणेही सोडले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.