Share

व्हीव्हीएस लक्ष्मण होणार टीम इंडियाचा नवीन प्रशिक्षक; बीसीसीआयचा मास्टरस्ट्रोक

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) पुन्हा एकदा दोन संघ निवडण्याची तयारी केली आहे. BCCI भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० मालिका आणि इंग्लंडच्या भारत दौऱ्यासाठी दोन वेगवेगळ्या संघांची निवड करेल. आता बातमी अशी आहे की दोन्ही संघांसोबत वेगळे कोचिंग स्टाफ असणार आहे.(vvs-laxman-to-be-team-indias-new-coach)

राहुल द्रविड कसोटी संघासह इंग्लंडला जाणार आहे, तर व्हीव्हीएस लक्ष्मण कोचिंग स्टाफमध्ये दाखल होणार आहे. वृत्तानुसार, लक्ष्मणला भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी आणि आयर्लंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी संघाचे प्रशिक्षक बनवले जाईल.

प्रशिक्षक राहुल द्रविड आणि रोहित शर्मा यांच्या नेतृत्वाखालील संघ १५ किंवा १६ जून रोजी यूकेला रवाना होणार आहे. तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी शिखर धवनला कर्णधार बनवले जाऊ शकते. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने इनसाइडस्पोर्टला सांगितले की, “आम्ही बर्मिंघम कसोटीपूर्वी २४ जून रोजी लीसेस्टरशायरविरुद्ध सराव सामना खेळू. राहुल द्रविड आणि संघ १५ किंवा १६ जूनला रवाना होतील.

आम्ही व्हीव्हीएस लक्ष्मणला भारत दक्षिण आफ्रिका टी-२० आणि आयर्लंड विरुद्ध टी-२०  मध्ये प्रशिक्षण देण्यास सांगू. भारतीय निवडकर्ते पुन्हा एकदा दोन संघ निवडतील. एक संघ दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी तर दुसरा इंग्लंड दौऱ्यासाठी खेळणार आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. चेतन शर्माच्या नेतृत्वाखालील निवड समिती दिनेश कार्तिक आणि हार्दिक पंड्यासह युवा संघाची निवड करेल. दुसरा संघ इंग्लंड दौऱ्यासाठी असेल. गेल्या वर्षी भारताचे दोन संघ इंग्लंड आणि श्रीलंकेत एकाचवेळी खेळत होते.

शिखर धवन आयपीएलमधील अव्वल खेळाडूंनी बनलेल्या टी-२० संघाचा कर्णधार म्हणून पुनरागमन करू शकतो. कर्णधारपदाच्या शर्यतीत हार्दिक पांड्याचेही नाव आहे. कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, जसप्रीत बुमराह आणि ऋषभ पंत यांच्यासह अन्य खेळाडूंना विश्रांती देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.

१५ जून रोजी ते इंग्लंडला जाणार आहेत. हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, संजू सॅमसन या खेळाडूंचा दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी टी-२० संघात समावेश केला जाऊ शकतो. गोलंदाज उमरान मलिक, मोहसीन खान आणि जितेश शर्मा यांना संधी दिली जाऊ शकते. रुतुराज गायकवाड, इशान किशन यांचीही निवड होऊ शकते.

इंग्लंड मालिकेसाठी चेतेश्वर पुजाराचे पुनरागमन निश्चित मानले जात असले तरी दुखापतीमुळे अजिंक्य रहाणेला संघातून बाहेर झाला आहे. हनुमा विहारी आणि श्रेयस अय्यर यांच्याशिवाय शुभमन गिलची इंग्लंड दौऱ्यासाठी निवड होणार आहे. १ ते ५ जुलै या कालावधीत इंग्लंडविरुद्धच्या ५व्या कसोटी सामन्यापूर्वी भारत इंग्लंडमध्ये सराव सामना खेळणार आहे. २३ मे रोजी मुंबईत होणाऱ्या निवड बैठकीत दोन्ही संघांची निवड केली जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या
VIDEO: वराच्या मित्रांनी दिले असे गिफ्ट, पाहताच नवरीच्या चेहऱ्याचा उडाला रंग, लाजेने झाली पाणी पाणी
‘अरे मला जगू द्याल की नाही’ म्हणत राज ठाकरे पत्रकारांवर भडकले; जाणून घ्या नेमकं काय घडलं
रोहीतच्या खणखणीत षटकारावर रितीकाऐवजी सारा तेंडूलकरचाच तुफान जल्लोष
रिंकू सिंगला मिळाला WWE चा खिताब; कपाळावर गंध, गळ्यात रुद्राक्ष, लुक पाहून चाहते झाले हैराण

खेळ ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now