मते मिळवण्यासाठी उमेदवाराचा अनोखा फंडा, मतदारांचे धुत आहेत कपडे

चेन्नई | निवडणूक लढवून जिंकून येण्याचे अनेकांचे स्वप्न असते. त्यासाठी उमेदवार सभा घेणे, जनतेचे प्रश्न ऐकणे, वेगवेगळी आश्वासने देणे, भेटीगाठी देणे या माध्यमातून प्रचार करत असतात. प्रत्येकाला असं वाटत असतं की माझाचं विजय झाला पाहिजे. त्यासाठी कुणी काहीही करायला तयार असतं. असाच एक हटके प्रचाराचा फंडा तमिळनाडूच्या नागपट्टीनम मतदारसंघातील एका उमेदवराने अवलंबला आहे.

थांगा कातिरवन असं या उमेदवराचं नाव आहे. तमिळनाडूमध्ये सध्या सत्तेवर असलेल्या अण्णाद्रमुक पक्षाने त्यांना उमेदवारी दिली आहे. प्रचार करत असताना त्यांनी जनतेचे कपडे धुवून दिले आणि मतदारांना आकर्षित करण्यासाठी जिंकून आल्यावर प्रत्येकाला कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन देईन असं आश्वासन दिलं आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून उमेदवाराच्या या हटके प्रचाराचा व्हिडिओ शेअर केला आहे. उमेदवाराने मते मिळवण्यासाठी ही अनोखी युक्ती आकारल्याने त्यांना पाहण्यासाठी लोक गर्दी करत असतात.

 

मतदारांना आकर्षित करून त्याने मत आपल्यालाच दिले पाहिजे यासाठी वेगवेगळ्या प्रकारे मतदारांना आकर्षित करण्याचा फंडा काही नवीन नाही. वेगवेगळ्या भेटवस्तू देणे, जाहीरनामा प्रसिध्द करणे, मतदारांच्या घरी जाऊन घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आशिर्वाद घेणे. असं अनेकजण करत असतात.

मात्र तमिळनाडूचा हा उमेदवार चक्क मतदारांचे कपडे धुवून आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असल्याने संपुर्ण राज्यामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. आगामी काळात याचा किती फायदा होतोय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान तमिळनाडू विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. यामध्ये द्रमुक आघाडी, काँग्रेस, भाजप, अण्णा द्रमुक पक्ष निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. तमिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेसाठी ते प्रयत्न करत आहेत. 234 जागांसाठी 6 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
…त्यामुळे दिल्लीतील शरद पवारांच्या पत्रकारपरिषदेत खोटेपणा उघडा पडला – देवेंद्र फडणवीस
ए भाई, तू जो कोण असशील माझ्यावर बोट उचलायचं नाही; अमृता फडणवीसांनी भरला दम
राष्ट्रवादीने केली परमबीर सिंगांच्या मालमत्तेच्या चौकशीची मागणी…
शशी कपूर आणि पत्नी जेनिफरचा ‘हा’ किस्सा वाचून तुम्हालाही धक्का बसेल

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.