बिहार निवडणुकीनंतर भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे. आता भाजपचा तेलंगणात हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी प्रचार सुरू आहे. याच दरम्यान भारतीय जनता पक्षाचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
मोहम्मद अली जिनांची भाषा बोलणाऱ्या असदुद्दीन ओवेसींना दिलेले प्रत्येक मत देशविरोधी आहे. तसेच ज्या मुल्यांवर भारत देश उभा आहे, त्या मुल्यांविरोधात ओवेसींना होणारे मतदान आहे, असे तेजस्वी सूर्या म्हणाले.
ओवेसी बंधू केवळ रोहिंग्या मुस्लिमांना भारतात प्रवेश देतील. ओवेसींना मिळणारे प्रत्येक मत हे भारताच्या विरोधात पडणार मत असेल. असदुद्दीने ओवेसी हे विक्षिप्त इस्लाम, विभाजनवाद आणि टोकाच्या विचारसरणीच्या गोष्टी करतात याच गोष्टी मोहम्मद अली जिन्नाही करायचे, अशा शब्दांमध्ये सुर्या यांनी ओवेसी बंधुंवर टीका केली.
भाजपने या निवडणुकीत आपली ताकद पणाला लावली आहे. भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, देवेंद्र फडणवीस हे या प्रचारात उतरले आहेत.
तसेच योगी आदित्यनाथ यांनी हेद्राबादचे नाव बदलणार असल्याचे सांगितले आहे. यावरून आता जोरदार राजकीय वातावरण तापले आहे. भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.