लग्नासाठी विवेक ऑबेरॉयने त्याच्या पत्नीसमोर ठेवली होती ‘ही’ अट; अट ऐकूण बायको झाली आश्चर्यचकीत

इंडस्ट्रीतील सर्वाधिक गाजलेले भांडण म्हणून सलमान खान आणि विवेक ऑबरॉयच्या भांडणाकडे पाहीले जाते. ऐश्वर्या रायमूळे विवेक आणि सलमानमध्ये भांडण झाले होते. त्याकाळी मिडीयाने देखील या गोष्टीला खुप जास्त उचलून धरले होते.

२००२ मध्ये कंपनी चित्रपटातून विवेक ऑबेरॉयने बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. त्यानंतर त्याने साथिया चित्रपटामध्ये काम केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला होता. त्यानंतर विवेकने मागे वळून पाहीले नाही.

क्यूं हो गया ना चित्रपटाच्या सेटवर त्याची ओळख ऐश्वर्यासोबत झाली होती. हळूहळू दोघांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. ऐश्वर्या आणि विवेकने एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. दोघांच्या अफेअरच्या चर्चा इंडस्ट्रीमध्ये सुरु झाल्या होत्या.

पण सलमान खानमूळे दोघांचे ब्रेकअप झाले. या ब्रेकअपची चर्चा सगळ्या इंडस्ट्रीमध्ये झाली. या ब्रेकअपमूळे विवेक ऑबेरॉय खुप जास्त दुखी झाला होता. त्याला प्रेमावरून विश्वास उठला होता. ही गोष्ट त्याच्या घरच्यांना माहीती होती.

म्हणून त्याच्या कुटूंबाची इच्छा होती की, त्याने लवकरात लवकर लग्न करुन घ्यावे. घरच्यांनी त्याच्यासाठी मुलगी बघायला सुरुवात केली. विवेक लग्नासाठी तयार नव्हता. पण त्याच्या आईच्या सांगण्यावरुन तो लग्नासाठी तयार झाला.

विवेकची आई कर्नाकटचे माजी मंत्री जीवराज यांच्या घरी गेल्या. त्यांनी विवेकसाठी प्रियंकाची निवड केली होती. या गोष्टीला विवेकचा नकार होता. त्याने लग्नासाठी आईसमोर एक अट ठेवली. त्याची अट ऐकल्यानंतर सुरुवातीला घरच्यांनी त्या गोष्टीला नकार दिला. पण नंतर त्यासाठी तयार झाले.

विवेकची अट होती की, त्याला मुलगी आवडली तर तो तिला एक वर्ष डेट करणार आणि मग लग्न करणार. विवेकला प्रियंका आवडली. त्याने लग्नाला होकार दिला. विवेकची पत्नी दिसायला खुपच सुंदर आहे. तिच्यासमोर ऐश्वर्या राय देखील फिकी पडते.

महत्वाच्या बातम्या –

व्हॅलेंटाईन डे स्पेशल: फक्त ७५० रुपयांमध्ये केले होते लग्न नाना पाटेकरने लग्न; वाचा त्यांची लव्ह स्टोरी

व्हॅलेंटाईन डे स्पेशल | ‘चीन’मुळे झाला होता रतन टाटांचा ब्रेकअप; कारण वाचून तुमचेही अश्रू होतील अनावर

जाणून घ्या मिलिंद गवळी यांची खरी लव्ह स्टोरी; लग्नासाठी ठेवली होती ‘ही’ अट

व्हॅलेंटाईन डे स्पेशल: वाचा धकधक गर्ल माधूरी दीक्षित आणि श्रीराम नेनेची लग्नानंतरची हटके लव्ह स्टोरी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.