बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्याने केलीये आतापर्यंत अडीच लाख कॅन्सर पीडित मुलांची मदत

बॉलिवूडमध्ये अनेकदा सेलिब्रीटी लोकांना मदत करत असतात. बऱ्याचवेळा त्यांनी केलेली मदत त्यांच्या सोशल मिडीया अकाऊंटवर दिसून येते. त्यामुळे त्यांची चांगलीच पब्लिसीटी होते.

अशात काही कलाकार असेही असतात, जे समाजाप्रती आपली पुर्ण जबाबदारी पार पाडतात, समाजात वेगवेगळ्या ठिकाणी ते मदत करत असतात, पण कधीच त्यांचा बोलबाला करत नाही. असेच काही कलाकार म्हणजे अमिताभ बच्चन, जॉनी लिव्हर, अजय देवगण आणि विवेक ओबेरॉय.

विवेक ओबेरॉय नेहमीच समाजातील लोकांची मदत करत असतो, पण कधीही त्याने त्या गोष्टीचा स्वता:च्या प्रसिद्धीसाठी उपयोग केला नाही.

विवेक गेल्या १८ वर्षांपासून कॅन्सर पीडित मुलांची मदत करत आहे. त्याने आतापर्यंत अडीच लाख कॅन्सर पीडित मुलांना उपचारासाठी आर्थिक मदत केली आहे.

पुर्ण जगात कॅन्सरमुळे सगळ्यात जास्त मृत्यु होतात. त्यात अगदी लहान मुलांचाही समावेश आहे. ३ सप्टेंबरला २००४ मध्ये विवेकच्या वाढदिवसानिमित्त कॅन्सर पेशंट्स अँड असोशिएशन (CPAA) ने एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी तो कॅन्सर मुलांना भेटला, त्यांना पाहून तो खुप प्रभावित झाला होता.

त्याने मुलांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी कॅन्सरमधून बरे झालेल्या लोकांना त्यांचा अनुभव मुलांना सांगण्यासाठी बोलावले होते. त्यामुळे मुलांच्या मनात कॅन्सरला हरवण्याची जिद्द निर्माण झाली.

त्यानंतर त्याने प्रत्येक वाढदिवस कॅन्सर पीडित मुलांसोबत साजरा करण्याचा निर्णय घेतला. कॅन्सर पीडित रुग्णांच्या उपचारासाठी चांगले असणाऱ्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलसमोर कॅन्सर पीडित रुग्णांचे नातेवाईक फुटपाथवर राहतात. त्यांच्या सर्वांसाठी त्याने घराची व्यवस्था केली होती.

तसेच पिडीत मुलांच्या उपचारासाठी त्याने आर्थिक मदतही सुरु केली. डॉक्टरांशी बोलून त्याने उपचार औषध कंपन्यांशी बोलून औषधे स्वस्त दरात मिळवून देण्याचा प्रयत्नही तो करत असतो.

इतकेच नाही तर ज्या गरीब लोकांनी आपल्या मुलांच्या उपचारासाठी घर, जमीन गहाण ठेवले आहेत, त्यांना त्यांच्या जमिनी मिळवून देण्याचेही काम तो करतो.

गरीब मुलांना कॅन्सर झाला तर त्यांचे आई-वडील खचून जातात. तसेच जवळ पैसे नसल्याने त्यांना उपचार करणेही शक्य होत नाही, मी माझ्या परिने शक्य तेवढी मदत करत असतो पण ती पुरेशी नाहीये हे मला माहित आहे. त्यामुळे समाजातील बाकीच्या लोकांनीही अशा मुलांसाठी पुढे आले पाहिजे असे त्याने म्हटले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.