Share

आॅक्सफर्ड विद्यापीठाने कार्यक्रम रद्द करताच संतापले अग्निहोत्री, म्हणाले, हा तर मोदींचा अपमान…

vivek agnihotri

‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री( Vivek Ranjan Agnihotri) यांचा कार्यक्रम ऑक्सफर्ड विद्यापीठाने रद्द केला आहे. यावरून दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठावर ‘हिंदुफोबिक’ असल्याचा आरोप केला आहे. ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. (vivek agnihotri tweet video about oxford university )

मिळालेल्या माहितीनुसार, ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना यूकेमधील ऑक्सफर्ड विद्यापीठाने भाषण देण्यासाठी ३१ मे रोजी आमंत्रित केले होते. पण अखेरच्या क्षणी हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी म्हंटले आहे की, “ईमेलवर दिलेल्या माहितीनुसार सर्व काही निश्चित करण्यात आले होते. पण काही तासांपूर्वी मला चुकून दोन बुकिंग झाले आहेत. त्यामुळे कार्यक्रम होऊ शकत नाही, असे सांगण्यात आले. मला न विचारता त्यांनी १ जुलै ही तारीख निश्चित केली आहे. कारण त्या दिवशी विद्यार्थी नसतील आणि कार्यक्रम करण्यात कोणताही अर्थ राहणार नाही”, असे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी व्हिडिओमध्ये सांगितले आहे.

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी व्हिडिओमध्ये पुढे म्हंटले आहे की, “ते मला रद्द करत नसून लोकशाहीने निवडून दिलेल्या भारत सरकारला रद्द करत आहेत. ते माझा अपमान करत नसून लोकांनी निवडून दिलेल्या पंतप्रधान मोदींचा अपमान करत आहेत. ते आम्हाला ‘इस्लामोफोबिक’ म्हणतात. जणू काही हजारो काश्मिरी हिंदूंना मारणे हे हिंदुत्वविरोधी नसून सत्यावर चित्रपट बनवणे म्हणजे इस्लामोफोबिक वाटत आहे. ”

“ऑक्सफर्ड विद्यापीठात हिंदू अल्पसंख्याक आहेत. हा अल्पसंख्याकांवर अत्याचार आहे”, असे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी व्हिडिओमध्ये सांगितले आहे. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, ” हिंदूफोबिक ऑक्सफर्ड युनियनने पुन्हा एकदा हिंदूंचा आवाज दाबला आहे. त्यांनी हिंदू विद्यार्थी अल्पसंख्याक आहेत हे सांगून कार्यक्रम रद्द केला हे सत्य आहे.”

“या युनियनचे निवडून आलेले अध्यक्ष पाकिस्तानी आहेत. कृपया माझा व्हिडिओ शेअर करा आणि या कठीण लढ्यात मला पाठिंबा द्या”, असे आवाहन दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री ट्विट करत केले आहे. ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारावर आधारित आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची आणि समीक्षकांची मोठी पसंती मिळाली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली होती.

महत्वाच्या बातम्या :-
अनोळखी मुलीला चहलने केला मेसेज, मुलीने ऍक्शन घेताच मागावी लागली माफी, पहा फोटो
आपल्या दोस्ताला जो नडेल त्याचा आपण…; टाईमपास ३ मध्ये राऊडी लूकमध्ये दिसणार हृता, पहा टीझर
हार्टअटॅकआधी केकेला जाणवली होती ‘ही’ लक्षणे, तुम्हीही ‘या’ ७ लक्षणांकडे कधीच नका करु दुर्लक्ष

आंतरराष्ट्रीय ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now