दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री(Vivek Agnihotri) यांचा ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट गेल्या महिन्यात ११ मार्च रोजी प्रदर्शित झाला होता. चित्रपट रिलीज झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर एवढी कमाई बघून लोकांना आश्चर्याचा धक्का बसला. या कमी बजेटच्या चित्रपटाने २५० कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे.(vivek-agnihotri-to-bring-out-black-truth-in-two-films)
‘द काश्मीर फाइल्स’च्या यशानंतर विवेक अग्निहोत्रीने याच चित्रपटाच्या टीमसोबत दोन नवीन चित्रपटांची घोषणा केली आहे. आपल्या चित्रपटाचे निर्माते अभिषेक अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी या दोन चित्रपटांची घोषणा केली. मात्र, या चित्रपटाशी संबंधित अधिक माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.
विवेक अग्निहोत्रीने त्यांच्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यासोबतच त्यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाचे निर्माते अभिषेक अग्रवाल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचप्रमाणे, विवेक अग्निहोत्री आणि पल्लवी जोशी यांची प्रोडक्शन हाऊस आणि अभिषेक अग्रवालचे प्रोडक्शन हाऊस पुढील दोन चित्रपटांसाठी पुन्हा एकत्र आल्याचे व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहे.
A very happy birthday to Tiger Producer @AbhishekOfficl. Gives me great pleasure to announce a new collaboration between @AAArtsOfficial & @i_ambuddha. Love. Always. pic.twitter.com/UMP9Maay2M
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) April 11, 2022
दोन्ही प्रॉडक्शन हाऊस आता भारतातील दोन सत्य घटना पडद्यावर आणणार आहेत ज्या अद्याप दिसल्या नाहीत. या घटना खूप भयानक आहेत. ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २५० कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे. कोरोना महामारीनंतर एवढी कमाई करणारा हा पहिलाच चित्रपट ठरला आहे.
‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटात ९० च्या दशकात काश्मिरी पंडितांवर कसे अत्याचार झाले, त्यामुळे त्यांना स्वतःच्या घरातून पळून जावे लागले हे दाखवण्यात आले आहे. या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी आणि दर्शन कुमार यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर पोटनिवडणूक! पैसे वाटप केल्याप्रकरणी भाजपच्या 5 कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात, हजारोंची रोकड जप्त
“सोमय्यांनी कोर्टात स्वताच चोरी मान्य केली, त्यामुळे आता त्यांना कधीही अटक होऊ शकते”
कोट्यवधींची मालकीन असणाऱ्या समंथाकडे एकेकाळी शिक्षणासाठी नव्हते पैसे; ‘हे’ काम करून झाली टॉलिवूडची स्टार
राज ठाकरेंनी मराठी मुद्द्यावरून यु-टर्न घेतलाय का? ठाण्यातील ‘त्या’ बँनरची चर्चा