सध्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची जोरदार चर्चा होत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आतापर्यंत २३८ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची आणि समीक्षकांची देखील मोठी पसंती मिळत आहे. हा चित्रपट काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारावर आधारित आहे. बॉलीवूडमधील अनेक अभिनेत्यांनी देखील या चित्रपटाचे कौतुक केलं आहे.(vivek agnihotri new announcement about student)
नुकतेच ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना भोपाळमधील एका विद्यापीठातील चित्रपट महोत्सवात आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी विवेक अग्निहोत्री यांची पत्नी पल्लवी जोशी देखील उपस्थित होत्या. या चित्रपट महोत्सवादरम्यान दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी मोठी घोषणा केली आहे.
या महोत्सवात दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीची घोषणा केली. या कार्यक्रमात विवेक अग्निहोत्री म्हणाले की, “विद्यापीठात चित्रपटाच्या अभ्यासासाठी येणाऱ्या पाच गरजू विद्यार्थ्यांना ५० हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्याची मी घोषणा करतो.” यावेळी विद्यार्थी देखील त्या ठिकाणी उपस्थित होते.
दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री पुढे म्हणाले की, “याप्रकरणी विद्यापीठाचे कुलगुरू एक विशेष समिती स्थापन करतील. त्या समितीच्या माध्यमातून शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल.” यावेळी दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि अभिनेत्री पल्लवी जोशी यांनी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना चित्रपटाच्या निर्मितीसंदर्भात मार्गदर्शन केले.
यावेळी अभिनेत्री पल्लवी जोशी म्हणाल्या की, “या विद्यापीठातील गुणवंत विद्यार्थ्यांना आमच्या आगामी सिनेमांमध्ये काम करण्याची संधी देण्यात येईल”, अशी घोषणा अभिनेत्री पल्लवी जोशी यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वी ‘द काश्मीर फाइल्स’ चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी चित्रपटाला विरोध करणाऱ्या व्यक्तींना चांगलेच सुनावले होते.
दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी चित्रपटाला विरोध करणाऱ्या लोकांसाठी एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. या पोस्टसोबत त्यांनी एक फोटो देखील शेअर केला होता. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी ही पोस्ट ट्विटरवर शेअर केली होती.
महत्वाच्या बातम्या :-
‘मी वसंतराव’ मधील अनिता दाते याआधीही झळकलीय सिनेमात; चित्रपटांची नावे वाचून धक्का बसेल
..तर मी कॅमेऱ्यासमोर टॉपलेस होणार, पुनम पांडेची चाहत्यांना अजब ऑफर, उडाली खळबळ
एप्रिल महिन्याच्या सुरूवातीलाच गॅस सिलेंडरचा भडका, तब्बल एवढ्या रुपयांनी महागला सिलेंडर