विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती अध्यक्षपद काँग्रेसकडे, अध्यक्षपदासाठी या मोठ्या नावाची चर्चा

पंढरपूर । शिर्डी येथील साईबाबा संस्थानचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे गेले आहे. आता पंढरपूर विठ्ठल मंदिर अध्यक्षपद हे काँग्रेसकडे जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. आता मात्र यासाठी काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांचे नाव समोर येत आहे. आता या पदासाठी मुंबईत जोरदार लॉबिंग सुरू झाले असले तरी आमदार प्रणिती शिंदे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

सोलापूरमधील काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी प्रणिती शिंदे यांना अध्यक्ष करण्याची मागणी पक्षाध्यक्षाकडे केली आहे. शिंदे कुटुंबीय हे विठ्ठलाचे निस्सीम भक्त असून कोणतेही काम करण्यापूर्वी ते आधी विठ्ठलाचे दर्शन घेतात. यामुळे आता उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

सुशीलकुमार शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी पंढरपूर साठी खूप मोठा निधी दिला होता. त्यांनी परिसराचा कायापालट केला आहे. मुंबईतील सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्षपद हे शिवसेनेकडे तर शिर्डी  साईबाबा संस्थानचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे आहे.

साई संस्थानचे अध्यक्षपद नेहमी काँग्रेसकडे असायचे. परंतु यंदा मात्र काही बदल करण्यात आले आहेत. यंदा शिर्डी संस्थांनचे अध्यक्षपद राष्ट्रवादीला तर पंढरपूर देवस्थानचे अध्यक्षपद काँग्रेसला देण्यात आले आहे. यामध्ये काही बदल करण्यात आले आहेत.

यावेळी पहिल्यांदाच विठ्ठल मंदिर समिती काँग्रेसकडे आल्याने कार्यकर्ते उत्साहात आहेत. मंदिराची वार्षिक उलाढाल ३५ कोटीच्या आसपास असली तरी विठुरायाच्या दर्शनाला वर्षभरात दीड कोटी भाविक येत असल्याने या देवस्थान ताब्यात येणे काँग्रेसला महत्वाचे वाटत आहे.

विठ्ठल मंदिराच्या माध्यमातून काम करणे फायदेशीर असल्याने काँग्रेसने अध्यक्षपदासाठी उमेदवार शोध सुरू केला आहे. यामध्ये प्राणिती शिंदे यांचे नाव आघाडीवर घेतले जात आहे. यामुळे आता कोणाची निवड होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

राज ठाकरे यांच्या वेगळ्या भूमिकेनंतर देखील आमदार राजू पाटील त्या आंदोलनात होणार सहभागी

मुंबईच्या रुग्णालयाचा भोंगळ कारभार! आयसीयुमध्ये व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णाला उंदराने कुरतडले

सावधान! ‘हे’ पदार्थ खात असाल, तर होऊ शकतात तुम्हाला गंभीर आजार; आजच करा बंद

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.