अवैध धंदे १०० टक्के बंद झालेच पाहीजेत, अन्यथा संबंधीत अधिकाऱ्याला तत्काळ निलंबित करणार

मुंबई : ‘पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अवैध धंदे सुरू राहिल्यास संबंधित पोलीस ठाण्यातील रात्रपाळीचे पोलीस निरीक्षक, प्रभारी अधिकारी यांना जबाबदार धरून निलंबन अथवा विभागीय चौकशीची कारवाई केली जाईल,’ असा इशारा पोलीस सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.

विश्वास नांगरे पाटील कर्मचाऱ्यांना सूचना देतानाची एक ध्वनिफीत समाजमाध्यमातून प्रसारित झाली आहे. या ध्वनिफीतीत नांगरे पाटील अधिकाऱ्यांना अवैध धंद्यांवरती कडक कारवाई करून ते बंद करण्याचे आदेश देत आहेत.

‘नियम पाळले नाहीत तर त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी,’ असा ठोस दम देताना नांगरे पाटील पुढे म्हणतात, अवैध धंदे १०० टक्के मला बंद हवेत. आता ‘झीरो टॉलरन्स’ पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांचे तसे आदेशच आहेत. आता कुणाची गय केली जाणार नाही, असाही इशारा नांगरे पाटील यांनी दिला.

दरम्यान, पोलीस ठाण्याच्या हद्दीत उपहारगृह, मद्यालय, पब, कुंटणखाने, हुक्का पार्लर, मसाज सेंटर, दारू, जुगार हे अवैधरित्या सुरू राहिल्यास संबंधित अधिकाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागले, असा इशाराही नांगरे पाटील यांनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

निवृत्त पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी केला धक्कादायक दावा; म्हणाल्या…

…तर लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही, आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिले लॉकडाऊनचे संकेत

‘…तर लॉकडाऊनबाबत नियोजन करा’, मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.