..त्यामुळे घरातले वातावरण नेहमी आनंदी असते, नांगरे पाटलांच्या मुलीने सांगितले वडिलांचे भन्नाट किस्से

चला हवा येऊ द्या या लोकप्रिय शोमध्ये नुकताच प्रजासत्ताक दिन विशेष सप्ताह पार पडला. यानिमित्ताने सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांना आमंत्रण देण्यात आले होते. याचदरम्यान वरिष्ठ आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटीलही आले होते.

यावेळी नांगरे पाटलांच्या मुलीही उपस्थित होत्या. त्यांनी वडिलांचे अनेक भन्नाट किस्से सांगितले. त्यांच्या मुली म्हणाल्या की, बाबा आमच्या पिढीला बोलतात पण ते स्वताच मोबाईलवर वेळ घालतात. नांगरे पाटील यांच्या पत्नी रूपाली, मुलगा रणवीर आणि कन्या जान्हवी सेटवर उपस्थित होते.

विश्वास नांगरे पाटील घरात एकदम सॉफ्ट असतात, असं त्यांच्या पत्नी म्हणाल्या. यानंतर स्वत: नांगरे पाटील म्हणाले की, बाहेर वर असलेल्या मिशा मात्र घरात आल्यानंतर खाली असतात. पुढे त्यांच्या पत्नी रूपाली नांगरे पाटील म्हणाल्या की, घरात ते कायम मोबाईलवर असतात.

काही विचारलं की उं? हं? करतात. यानंतर त्यांची मुलगी बाबांचे किस्से सांगू लागली. ती म्हणाली की, जनरेशनला नावे ठेवताना कायम मोबाईलवरच असतात. त्यांना आमच्या जनरेशनशी प्रॉब्लेम आहे. काही झालं की ते आम्हाला म्हणतात, आम्हाला लहाणपणी काहीच मिळालं नाही.

मोबाईलमुळे सगळं सोपं झालंय. लायब्रेरीमध्ये जा असं ते आम्हाला सांगत असतात, असं त्यांची मुलगी म्हणाली. पुढे तिने बाबांचे म्हणजेच विश्वास नांगरे पाटलांचे अनेक भन्नाट किस्से सांगितले. बाबा बाहेर सिरीअस दिसत असले तरी घरी खराब जोक मारतात यामुळे आमच्या घरात आनंदी वातावरण असते.

असं जान्हवीने सांगताच उपस्थित प्रेक्षकवर्गात एकच हशा पिकला. विश्वास नांगरे पाटलांनी मात्र मुलांच्या या गोड तक्रारींवर कुठलीही प्रतिक्रीया दिली नाही उलट त्यांच्या चेहऱ्यावर आनंदच होता. नंतर त्यांचा मुलगा म्हणाला की, प्रत्येक मुलाच्या आयुष्यात चिप्स असतात पण आमच्या नशिबातच नाही.

दोन तीन वर्षे झाली जंक फुड खालेले नाही. कोरोनाच्या काळात आम्ही व्यायाम, पुरेशी झोप आणि सकस आकार अशा सगळ्या सवयी आम्ही पाळल्या होत्या. तसेच मुलांना दहा महिने आईस्क्रीम खाऊ न दिल्याने ते आमच्यावर नाराज आहेत. पण आम्ही सर्दी खोकला किंवा कुठलाही संसर्ग होऊ नये याची पुर्ण काळजी घेतली होती.

नाशिकला पदभार सांभाळत असतानाही तेथील पोलीसांची पुर्ण काळजी घेतल्याचेही त्यांनी सांगितले. विश्वास नांगरे पाटील यांचा अरेंच मॅरेज झाले होते. त्यांचा विवाह २००० मध्ये झाला होता. यानंतर साखरपुड्यापर्यंत अरेंच होतं आणि सहा महिन्यानंतर लव्ह झालं अशी खट्याळ प्रतिक्रीया विश्वास नांगरे पाटील यांनी दिली.

पुढे ते म्हणाले की, माझी पर्सनॅलिटी अमिताभ बच्चन यांच्यासारखी आहे असं मला अनेकजण म्हणायचे. लहाणपणी एनसीसीमध्ये असल्याने मला युनिफॉर्मची आवड निर्माण झाली. आएएस बनायची इच्छा होती पण दोन वेळा आयपीएस रॅंकिंग मिळाली. माझ्या नशिबात तेच असावं. आज २३ वर्षे पोलीस सेवेत असताना कोणतीही खंत नाही, असे नांगरे पाटील चला हवा येऊ द्याच्या सेटवर म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

‘हा पुरस्कार माझी झोळी भरणाऱ्यांचा, माझ्या लेकरांचा, मग उरलासुरला माझा’

शेतकरी आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणावर शरद पवारांचे मोठे विधान, म्हणाले…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.