महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र समोर येत आहे. कारण मुंबई काँग्रेसचे महासचिव विश्वबंधू रॉय यांनी पक्षश्रेष्ठींकडे शिवसेनेविरोधात तक्रार केली आहे. शिवसेना नेत्यांचे घोटाळ्यांमध्ये नाव येत असल्याने त्याचा धोका कॉंग्रेसला असल्याची तक्रार विश्वबंधू रॉय यांनी सोनिया गांधी यांच्याकडे केली आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात असून त्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र काम करताना दिसत आहेत. सरकारमध्ये विसंवाद असल्याची टीका विरोधक वारंवार करतात. पण आता अतंर्गत वादही चव्हाट्यावर आले आहे. सरकारमध्ये कधीही नवा घोटाळा बाहेर येईल, अशी भीती रॉय यांनी सोनियांना दिलेल्या पत्रात नमूद केली आहे.
आघाडी सरकारमध्ये काँग्रेसला दुय्यम स्थान मिळत असल्याची तक्रार पत्राद्वारे करण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे. मात्र या वर्षभरात केवळ मित्र पक्ष म्हणूनच काँग्रेसचे आघाडीत स्थान राहिले आहे. अश्या आशयाचे रॉय यांनी यापूर्वीही काँग्रेस अध्यक्षांना पत्र लिहिलं होते.
ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; देवेंद्र फडणवीस, राज ठाकरेंसह ‘या’ नेत्यांच्या सुरक्षेत मोठी कपात
राज्यात ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव? ‘या’ जिल्ह्यात २८ कोंबड्या दगावल्या…
तब्बल ७ वर्षांनी भिडे गुरूजींचा भिमा कोरेगाव दौरा; पोलिसांनी थांबण्यास केला मज्जाव