विश्वजित कदम यांना धक्का ! जिल्हा बँक निवडणुकीत मावस भाऊ पराभूत

सांगली जिल्हा बँक निवडणुकीत सर्वांनाच आश्चर्य होईल असे निकाल लागले आहेत. जत मधील निकाल सर्वात धक्कादायक मानला जात आहे. जत सोसायटी गटात काँग्रेसला मोठा धक्का बसला असून विद्यमान संचालक, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार विक्रम सावंत पराभूत झाले आहेत. त्यांचे विरोधक असलेल्या भाजपच्या प्रकाश जमदाडे यांना ४५ मत मिळाली तर विक्रम सावंत यांना ४० मत मिळाली. विषेश म्हणजे सावंत हे राज्याचे मंत्री विश्वजीत कदम यांचे मावस भाऊ आहेत.

कडेगाव सोसायटी गटात महाविकास आघाडीचे आमदार मोहनराव कदम ४२ मतांनी विजयी झाले आहेत. त्यांच्या विरोधातील भाजपचे तुकाराम शिंदे यांना अवघी ११ मत मिळाली. तिकडे कवठेमहांकाळ सोसायटी गटात महाविकास आघाडीतील शिवसेनेचे अजितराव घोरपडे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. घोडपडे यांना ५४ मत मिळाली तर अपक्ष विठ्ठल पाटील यांना १४ मत मिळाली आहेत.

आटपाडी सोसायटी गटात महाआघाडीतील शिवसेनेचे तानाजी पाटील हे हि ११ मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपचे माजी आमदार राजेंद्र देशमुख यांचा पराभव केला. तासगाव गटात महाविकास आघाडीचे बी. एस. पाटील १८ मतांनी विजयी झाले असून त्यांनी भाजपचे सुनिल जाधव व विद्यमान संचालक आणि अपक्ष उमेदवार डॉ. प्रताप पाटील यांना पराभूत केले. वाळवा सोसायटी गटात विद्यमान अध्यक्ष महाआघाडीचे दिलीप पाटील हे एकतर्फी विजयी झाले असून त्यांना १०८ मत मिळाली. तर त्यांचे विरोधक भाजपचे भानुदास मोटे २३ मत मिळाली.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.