काही दिवसांपूर्वी दहा रुपयांची एक नोट चर्चेत आली होती. या नोटवर एक मजकूर लिहिण्यात आला होता. या मजकुरात प्रेयसीने तिच्या प्रियकरासाठी एक मेसेज लिहिला होता. प्रेयसीने प्रियकराला(boyfriend) तिच्या लग्नाची माहिती दिली होती. तसेच पळवून घेऊन जाण्याची विनंती केली होती. यावर प्रियकराने उत्तर दिले आहे.(Vishal finally gets Kusum’s message, Rs 10 note goes viral again)
प्रियकराने उत्तर देताना पुन्हा दहा रुपयांच्या नोटेचाच वापर केला आहे. प्रेयसीने प्रियकराला दहा रुपयांच्या एका नोटवर मेसेज लिहिला होता. “विशाल, माझे लग्न २६ एप्रिलला आहे. मला इथून घेऊन जा. मी तुझ्यावर प्रेम करते. तुझी कुसुम.” या नोटची एक पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली होती. यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या.
एका युजरने कमेंट करत म्हंटले होते की, “२६ एप्रिलपूर्वी कुसुमचा मेसेज विशालपर्यंत पोहोचवला पाहिजे… प्रेमात असलेल्या व्यक्तींनी एकत्र येणे आवश्यक आहे.” तर दुसऱ्या एका युजरने कमेंट करत म्हंटले होते की, “सर्वांनी विशालला ही पोस्ट टॅग करा.” अनेकांनी ही पोस्ट विशालला टॅग केली होती. महत्वाची बाब म्हणजे, कुसुमने दिलेला मेसेज विशालला मिळाला आहे.
या मेसेजला विशालने उत्तर देखील दिले आहे. उत्तर देताना विशालने दहा रुपयांच्याच नोटेचा वापर केला आहे. विशालने दहा रुपयांच्या नोटवर एक मजकूर लिहिला आहे. विशालने दहा रुपयांच्या नोटवर लिहिले आहे की, “‘कुसुम, मला तुझा संदेश मिळाला आहे. मी तुला घ्यायला येईन. मी तुझ्यावर प्रेम करतो. तुझा विशाल.”
आता लोक २६ एप्रिलची वाट पाहत आहेत. २६ एप्रिलला विशाल कुसुमला घेऊन जाणार का? याची चर्चा सध्या रंगू लागली आहे. या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. कुसुम आणि विशालच्या व्हायरल झालेल्या प्रेमपत्रावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेक युजर्स विनोदी मीम्स देखील शेअर करत आहेत.
यापूर्वी देखील नोटवर लिहिलेले असे मेसेज व्हायरल झाले आहेत. काही वर्षांपूर्वी दहा रुपयांच्या नोटेवर ‘सोनम गुप्ता बेवफा है’ असा मेसेज व्हायरल झाला होता. यावर देखील अनेकांनी कमेंट केल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी २० रुपयांच्या नोटेवर ‘राशी बेवफा है’ असा मेसेज व्हायरल झाला होता.
Ek pyar Aisa bhi.
Mil gya kusum ka jvab.
ViShal 26April aayega#LOVEDIVE pic.twitter.com/MGVV0QJX4B— AJAY YADAV (@AJAYYAD46374764) April 23, 2022
महत्वाच्या बातम्या :-
‘त्या’ कारमध्ये मोदी असते तरीही ती फोडलीच असती; अभिनेत्री दीपाली सय्यदकडून हल्ल्याचं समर्थन
भारतीय क्रिकेटपटूंमध्येच जुंपली; इरफान म्हणाला मी देशासाठी खेळलोय, मला बोलायची तुझी लायकी नाही
नवनीत राणांना कोठडीत हीन वागणूक? नेमकं काय घडलं? गृहमंत्र्यांनी सांगितली सत्य परिस्थिती