अर्णब गोस्वामीचा फोटो ट्विट करून वीरेंद्र सेहवाग म्हणतोय, मला खूप मारलंय

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना आज पुण्यात खेळवला गेला. या सामन्यात धावांचा पाऊस पडला. भारतीय गोलंदाजांची तर तुफान धुलाई झाली. इंग्लंडने तब्बल ६ विकेट आणि ६ षटके राखून हा सामना सहज जिंकला.

भारतीय गोलंदाजांच्या झालेल्या धुलाईवर सोशल मिडीयात तुफान मिम्स व्हायरल होत आहेत. माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनेही या धुलाईवर मजेशीर मीम तयार केले आहे. या मीममध्ये रिपब्लिक टिव्हीचा संपादक अर्णब गोस्वामीचे छायाचित्र आहे. त्यावर muze mara gaya hai. i hale been beaten हे लिहीलं आहे. ( मला खूप मारलय असा त्याचा अर्थ होतो). Indian bowlers today ही कॅप्शन छायाचित्राच्यावर दिली आहे. (आज भारतीय गोलंदाजांची अवस्था, असा त्याचा अर्थ आहे).

अन्वय नाईक हत्या प्रकरणात तुरूंगात गेल्यानंतर अर्णब गोस्वामीची महाराष्ट्र पोलीसांनी  चांगलीच धुलाई केली होती. त्यावेळी अर्णब पोलीस व्हॅनमधून किंचाळत होता की पोलीसांनी मला खूप मारलय. त्यावेळी त्याचे हे घाबरलेले छायाचित्र खूप व्हायरल झाले होते. त्यावरूनच हे मिम सेहवागने बनवलं आहे.

धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवाग नेहमीच असे मजेशीर ट्विट करत असतो. त्याचे ट्विट प्रचंड व्हायरल होत असतात.

आजच्या सामन्यात इंग्लीश फलंदाजांनी भारतीय गोलंदाजीच्या मर्यादा दाखवून देत चौकार षटकारांची आतषबाजी केली. भारताच्या ३३७ ह्या बलाढ्या धावसंख्येला इंग्लंडने अवघ्या ४३.३ षटकात पार केले. संपूर्ण डावात तब्बल २० पेक्षा जास्त षटकार मारले.

भारतीय गोलंदाज बेन स्टोक्स व जॉनी बेअरस्टोच्या फटकेबाजीपुढे हतबल झाले होते. बेअसस्टोने 123 , स्टोक्सने 99 , तर जेसन रॉयने 55  धावा चोपत भारतीय गोलंदाजीची पिसे काढली.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.