विराट कोहलीला कर्णधार पदावरून काढा या मागणीवर सेहवाग म्हणतोय..

आयपीएल २०२० मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला (आरसीबी) सातत्याने अपयश येत आहे. यासाठी टिमचा कर्णधार विराट कोहली याला दोशी मानले जात आहे. विराटचे अपयशी नेतृत्व याची सध्या चर्चा आहे. परंतु माजी भारतीय सलामीवीर वीरेंद्र सेहवागने विराट कोहलीची पाठराखण केली आहे.

वीरेंद्र सेहवाग म्हणाला की , “रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी) चे कर्णधार म्हणून विराट कोहलीला काढून टाकू नये. विराट कोहली भारतीय संघाचा कर्णधार असताना हेच निकाल वेगळे असतात.”

“विराट कोहली कसोटी, एकदिवसीय आणि टी -२० मालिका जिंकतो, परंतु जेव्हा तो बंगळुरूकडून खेळतो किंवा आरसीबीच्या कर्णधार पदाचा मुद्दा येतो तेव्हा त्याची कामगिरी अपेक्षित होत नाही.” असे सेहवाग म्हणाला.

तर एका चांगल्या कर्णधाराला चांगल्या टिमचीही गरज असते. मला वाटते की संघ व्यवस्थापनाने कर्णधार बदलण्याचा विचार करू नये. तर संघात काय बदल करता येतील हा विचार करावा. असे मत सेहवागने मांडले.

गौतम गंभीरने कोहलीला कर्णधारपदावरून दूर करण्याची विनंती केली पण सेहवाग त्याच्याशी सहमत नाही. खराब कामगिरीमुळे आरसीबीने अ‍ॅलिमिनेटरमधून बाहेर झाली. आरसीबीने अद्याप एकदाही आयपीएलचे जेतेपद मिळवलेले नाही. आयपीएलमधील खराब कर्णधारपदीनंतर अनेक दिग्गजांनी कोहलीवर प्रश्न केला होता पण आता सेहवागने विराटला पाठिंबा दिला आहे.

ठाकरे सरकारचे डोळे उघडले! एसटी कर्मचाऱ्यांना एक महिन्याचा पगार आणि दिवाळी बोनस जाहीर

बाॅलीवूडमध्ये काम करण्यासाठी इरेला पेटलेल्या दिशाने शिक्षण अर्ध्यावर सोडलं होतं; वाचा पुर्ण किस्सा..

एकनाथ खडसेंनी मागीतली ब्राह्मण समाजाची जाहीर माफी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.