हिटमॅन रोहीतला डच्चू दिल्याने विरेंद्र सेहवाग कोहलीवर भडकला, म्हणाला…

अहमदाबाद | अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पहिला टी २० सामना खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंनी क्रिकेटप्रेमींना निराश केले आहे. भारत आणि इंग्लंमध्ये सामना खेळला गेला होता. यामध्ये टीम इंडियाच्या फलंदाजांना चमक दाखवता आली नाही. २० षटकांमध्ये अवघ्या १२५ धावा करून भारताचे खेळाडू तंबूत परतले.

टीम इंडियाची कामगिरी सुरूवातीपासूनचं निराशाजनक होती. अवघ्या १२५ धावा इंग्लंडने सहजपणे काढून पहिलाचं सामना जिंकला. या पराभवामूळे अनेकांनी भारताचा कर्णधार विराट कोहली याच्यावर टीका केली. विराटने भारताचा धडाकेबाज खेळाडू ‘हिटमॅन’ रोहित शर्माला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला होता.

भारताचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवाग यानेही विराटवर हल्लाबोल केला आहे. विरेंद्र सेहवाग म्हणाला, “हिटमॅन रोहित शर्मा पहिल्या दोन टी20 सामन्यामध्ये खेळणार नाही. पण भारत हरला तर ही रणनीती कायम राहील का?, मी जर कर्णधार असतो तर मी उत्कृष्ट कामगिरी करणारा संघ मैदानात उतरवला असता”.

पुढे म्हणाला, “क्रिकेटप्रेमी रोहितला पाहण्यासाठी स्टेडियमवर येतात. रोहित शर्माला मी मैदानात उतरवलचं असतं. मी स्वत: रोहितचा मोठा फॅन आहे. जर रोहित शर्मा खेळला नाही तर माझा टीव्ही कायम बंद राहिल”. असं विरेंद्र सेहवाग यांनी म्हटलं आहे.

विराट कोहली, के एल राहूल, शिखर धवन, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, श्रेयस अय्यर, भूवनेश्वर कुमार, शार्दूल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल हे खेळाडू टीम इंडियाकडून मैदानात उतरले होते.

दरम्यान टी २०च्या पहिल्या सामन्यात कर्णधार विराट कोहली शुन्यावर बाद झाला होता. यावेळी रिषभ पंतने रिव्हर्स स्विप षटकार खेचला होता. त्याचा हा शॉर्ट क्रिकेट रसिक पाहतचं राहिले होते. पण रिषभ पंतही अवघ्या २१ रन्स करून बाद झाला.

महत्वाच्या बातम्या-
“देवेंद्र फडणवीसांना पोलिस गुप्त माहिती पुरवतात”- संजय राऊत
भारत सामना हारला ही गोष्ट सहन झाली नाही; म्हणून अभिनेत्याने गमावला होता जीव
बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्याने केलीये आतापर्यंत अडीच लाख कॅन्सर पीडित मुलांची मदत
जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दाऊद इब्राहीमला आमिर खानने ‘असा’ दिला होता चकवा

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.